‘Vidhi Seva Mahamelava’ on Sunday
रविवारी १३ नोव्हेंबरला ‘विधी सेवा महामेळावा’
पुणे : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण यांच्या ‘पॅन इंडिया’ प्रकल्पांतर्गत महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार १३ नोव्हेंबर रोजी नेस वाडिया महाविद्यालयामध्ये ‘विधी सेवा महामेळावा’ आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष श्याम चांडक यांनी दिली आहे.
कायदेशीर जन जागृतीद्वारे नागरिकांचे सशक्तीकरण हा या मेळाव्याचा उद्देश आहे.
या मेळाव्याच्या उद्घाटनास मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश तथा महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष संजय गंगापूरवाला, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश माधव जमादार, अरिफ डॉक्टर उपस्थित राहणार आहेत.
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव मंगल कश्यप, पुणे बार असोशिसिएशनचे अध्यक्ष पांडुरंग थोरवे हे यावेळी उपस्थित असतील. नागरिकांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहनही श्री. चांडक यांनी केले आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com