Prime Minister Narendra Modi reiterates that a solid home is the foundation of a better future
पक्कं घर हा चांगल्या भविष्याचा पाया असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं पुनर्प्रतिपादन
नवी दिल्ली : घर म्हणजे केवळ विटा आणि सिमेंटचे बांधकाम नाही, तर त्याच्याशी आपल्या भावना, आपल्या आकांक्षा जोडलेल्या असतात. घराची संरक्षकभिंत आपल्याला केवळ सुरक्षाच देत नाहीत तर आपल्यामध्ये उज्वल भविष्याचा आत्मविश्वासही निर्माण करते.” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
पक्कं घर हा चांगल्या भविष्याचा पाया असल्याचं पुनर्प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या एका लाभार्थ्याला लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटलय की, लाभार्थ्यांच्या आयुष्यातले हे अविस्मरणीय क्षण देशाच्या सेवेसाठी अथक काम करत राहण्यासाठी प्रेरणा देत आहेत.
पंतप्रधान आवास योजनेंतर्गत आतापर्यंत कोट्यवधी लाभार्थ्यांना त्यांची पक्की घरे मिळाली आहेत, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. प्रत्येक गरजू कुटुंबाला घरे देण्याच्या उद्दिष्टाप्रती सरकार कटीबद्ध आहे. सरकार विविध लोककल्याणकारी योजनांच्या माध्यमातून देशवासीयांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहे असे ते म्हणाले.
प्रत्येक गरजू कुटुंबाला घर देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून देशातल्या जनतेच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी सरकार गांभीर्यानं प्रयत्न करत आहे, असंही प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे.
“लाभार्थ्यांच्या जीवनातील संस्मरणीय क्षण राष्ट्रसेवेसाठी अथक, अविरत कार्य करत राहण्यासाठी प्रेरणा आणि ऊर्जा देतात” असे पंतप्रधानांनी सुधीर यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
सुधीर यांना नुकतेच पीएम आवास योजनेअंतर्गत स्वतःचे पक्के घर मिळाले आणि त्यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून त्यांचे आभार मानले. बेघर गरीब कुटुंबांसाठी वरदान अशा शब्दात पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात सुधीर यांनी पंतप्रधान आवास योजनेचे वर्णन केले आहे. ते भाड्याच्या घरात राहत होते आणि 6-7 वेळा त्यांना घरे बदलावी लागली होती. वारंवार घर बदलण्याच्या त्याच्या वेदनाही त्यांनी पत्रात सांगितल्या.
Hadapsar News Bureau.