The sacrifice of martyrs should be remembered: Principal Dattatray Jadhav
हुतात्म्यांचे बलिदान स्मरणात ठेवावे
– प्राचार्य दत्तात्रय जाधव
महात्मा गांधीजी व सर्व हुतात्म्यांना साधना विद्यालय व आर आर शिंदे ज्युनियर कॉलेज मध्ये आदरांजली अर्पण
हडपसर: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी सत्य,अहिंसा,शांततेच्या मार्गाने स्वातंत्र्यलढा उभारला. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्यासाठी तरूणांना प्रेरणा दिली. हुतात्म्यांनी देशासाठी बलिदान दिले त्यामुळेच भारताला स्वातंत्र्य मिळाले.
30 जानेवारी, महात्मा गांधी पुण्यतिथी हा दिवस म्हणून संपूर्ण भारतात हुतात्मा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. देशासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांचे बलिदान कायम स्मरणात ठेवावे असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे आजीव सभासद व आजीव सभासद बोर्डाचे सचिव , साधना विद्यालय व आर.आर.शिंदे ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य दत्तात्रय जाधव यांनी केले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त आयोजित साधना विद्यालय व आर.आर शिंदे ज्युनियर कॉलेजमधील आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 11 वाजता सर्व विद्यार्थी व सेवकांनी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून महात्मा गांधीजी व सर्व हुतात्म्यांना आदरांजली अर्पण केली.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने यशराज मोटे,शंभूराज सरकटे,या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. चित्रा हेंद्रे यांनी देशभक्तीपर गीत सादर केले.शिक्षक मनोगतात प्रतिभा हिले यांनी महात्मा गांधीजी व हुतात्म्यांची माहिती सांगितली.
या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय जाधव ,उपमुख्याध्यापिका योजना निकम, पर्यवेक्षक शिवाजी मोहिते, ,कुमार बनसोडे,माधुरी राऊत, आजीव सभासद लालासाहेब खलाटे ,आजीव सेवक अनिल मेमाणे, विभागप्रमुख विजय सोनवणे,पांडूरंग गाडेकर, सांस्कृतिक विभागप्रमुख संगिता रूपनवर व सर्व सदस्य ,विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रूपाली सोनावळे यानी केले.सूत्रसंचालन रूपाली बागबंदे यांनी केले.तर आभार सविता पाषाणकर यांनी मानले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com