Emphasis on creating a ‘health system’ that is people-oriented and able to cope with changing conditions
लोकाभिमुख आणि बदलत्या परिस्थितीस सक्षमपणे सामोरी जाणारी ‘आरोग्य व्यवस्था ‘ निर्मितीस प्राध्यान – आरोग्यसेवा आयुक्त
पुणे : लोककेंद्रित आरोग्य सेवा, डेटा आधारित निर्णय घेणे आणि सक्षमकर्ता म्हणून माहिती तंत्रज्ञान चा वापर करून लोकाभिमुख कठीण आणि बदलत्या परिस्थितीस सक्षमपणे सामोरी जाणारी ‘आरोग्य व्यवस्था’ निर्मितीस प्राध्यान देणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन आरोग्यसेवा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले.
आरोग्य सेवेतील पुणे येथील विभाग प्रमुखांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
श्री.मुंढे म्हणाले, आरोग्य विभाग त्याच्या सर्व भागधारकांशी प्रभावी समन्वयाने काम करेल. आरोग्यसेवा विषयीची माहिती अद्ययावत ठेवून त्यांचा नियोजन व संस्थांच्या सेवांच्या विकासासाठी वापर करावा, आरोग्यासंबंधी ऋतूनुसार आरोग्य सेवांची तयारी ठेवावी .
साथीच्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक जिल्हा व प्रत्येक तालुक्यातील परिस्थिती वर सनियंत्रण ठेवावे. रोजच्या आकडेवारीवर लक्ष ठेवून जिल्हा व प्रत्येक तालुक्यातील आरोग्य सेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांची यांच्याशी समन्वय ठेवावा. जिल्हा व गाव पातळीवरील संस्थांशी चांगला संवाद ठेवून रोजचा आढावा घेतला जावा अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
आरोग्यसेवा उपक्रमांना मदत करणाऱ्या शासकीय, निमशासकीय विकासात्मक संस्था यांनीही आपली भूमिका व कार्य हे कार्याची पुनरावृत्ती न होऊ देता व कार्यातील उणिवांचाही अभ्यास करावा असे त्यांनी सांगितले.
जागतिक आरोग्य संघटनेच्या आय. पी. एच. एस. स्टँडर्ड नुसार आरोग्य प्रणालीसाठी वापरात येणाऱ्या , आरोग्य सेवेतील घटक, आरोग्य माहिती प्रणाली, आवश्यक असणाऱ्या औषधांची उपलब्धता, आरोग्य प्रणाली वित्त पुरवठा, नेतृत्व व शासन या सहा घटकावर भर देण्याविषयी त्यांनी अधिकाऱ्यांना सुचित केले.
आरोग्य सेवा अधिक सक्षम व लोकाभिमुख होण्यासाठी आपला प्राधान्यक्रम असेल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले .या बैठकीत पुणे येथील आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर व पुणे येथील सर्व विभाग प्रमुख, सहाय्यक संचालक व विकासात्मक स्वयंसेवी संस्थेचे सल्लागार उपस्थित होते .
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com