ओल्या कचऱ्याच्या इंधनापासून Compressed Biogas (CBG ) पुणे शहरातील बसेस चालविण्याचे उपक्रमाचे उद्घाटन

Inauguration of Public transport buses in the city on garbage fuel ओल्या कचऱ्याच्या इंधनापासून पुणे शहरातील बसेस चालविण्याचे उपक्रमाचे उद्घाटन हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Inauguration of Public transport buses in the city on garbage fuelI

ओल्या कचऱ्याच्या इंधनापासून Compressed Biogas (CBG ) पुणे शहरातील बसेस चालविण्याचे उपक्रमाचे उद्घाटन

पुणे: पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत ओल्या कचऱ्यापासून Compressed Biogas (CBG) इंधन निर्मितिचा प्रकल्प सुस रोड, बाणेर येथे उभारण्यात आलेला आहे. या प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या CBG इंधनापासून पुणे शहरातील बसेस चालविण्याचे अभिनव उपक्रमाचा उद्घाटन समारंभ आज दि. १/७/२०२२ रोजी पुणे महानगरपालिका मुख्य इमारती समोरील बस स्थानक येथे मा. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते पार पडला.Inauguration of Public transport buses in the city  on garbage fuel ओल्या कचऱ्याच्या  इंधनापासून  पुणे शहरातील बसेस चालविण्याचे उपक्रमाचे उद्घाटन   हडपसर मराठी बातम्या  Hadapsar Latest News Hadapsar News

पुणे शहरातील बसेस चालविण्याचे अभिनव उपक्रम “सिटी वेस्ट टू सिटी बस” पुणे महानगरपालिका, पुणे महानगर परिवहन महामंडळ लि., इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड, मे. नोबेल एक्स्चेंज यांच्या संयुक्त संकल्पनेने राबविण्यात येत आहे.

सीएनजी ऐवजी पुणे शहरातील ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून निर्माण झालेल्या सिबिजीचा (CBG) हा एक पर्यावरणपूरक दीर्घकालीन शाश्वत उपाय आणि इतर शहरांसाठी अनुकरण करण्यासाठी एक आदर्श ठरेल.

तळेगावजवळील सोमाटणे येथे असलेल्या इंडियन ऑईल रिटेल आउटलेटमध्ये पीएमपीएमएलच्या बसेसला इंधन दिले जाईल. आजपासून दैनंदिन सुमारे १०-१५ बसेसमध्ये कचऱ्यापासून निर्माण होणारे CBG इंधन भरण्यासाठी व्यावसायिक ऑपरेशन्स सुरु झाले आहे आणि टप्प्याटप्प्याने दैनंदिन सुमारे १०० सिटी बसेसपर्यंत सदरचे उपक्रम राबविण्यात येणार आहे.

याकरिता सध्यस्थितीत पुणे शहरामध्ये निर्माण होणारे सुमारे १२५ मे. टन ओला कचरा सदर प्रकल्पामध्ये प्रक्रिया करण्यात येत असून सदर प्रकल्पाची २०० मे. टन प्रती दिन क्षमता वाढ करण्याचे नियोजन आहे.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *