Newly elected President Draupadi Murmu will be sworn in on Monday
नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा शपथविधी येत्या सोमवारी
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना आज राष्ट्रपती भवनातर्फे निरोप
नवी दिल्ली : नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा शपथविधी सोहळा परवा सोमवारी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये होणार आहे. त्या भारताच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून शपथग्रहण करतील.
देशातील सर्वोच्च घटनात्मक पद धारण करणाऱ्या द्रौपदी मुर्मू या पहिल्या आदिवासी महिला आहेत. विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा पराभव करत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू या अध्यक्षपदी निवडून आल्या.
शपथविधी समारंभाच्या पार्श्वभूमीवर, कार्मिक आणि प्रशिक्षण विभागानं केंद्र सरकारची काही कार्यालये ठराविक कालावधीसाठी काही अंशी बंद करण्याचे निर्देश जारी केले आहेत. नवनिर्वाचित राष्ट्रपतींच्या शपथविधी समारंभाच्या आधी, संसदेत आज संध्याकाळी सेंट्रल हॉलमध्ये मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निरोप दिला जाईल. उद्या ते राष्ट्राला संबोधित करुन निरोप घेतील.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना आज राष्ट्रपती भवनातर्फे निरोप
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल रात्री नवी दिल्लीत मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासाठी निरोप भोजन समारंभाचे आयोजन केले होते.
पंतप्रधानांनी ट्वीट केले आहे:
“राष्ट्रपती कोविंद यांच्या सन्मानार्थ मेजवानी आयोजित केली होती. द्रौपदी मुरुमू जी, वेन्कैय्या जी, मंत्री यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. तळागाळातील अनेक यशवंत, पद्म पुरस्कार प्राप्त, आदिवासी समाजाचे नेते आणि इतर यांचे या मेजवानीमध्ये स्वागत करताना आम्हाला आनंद झाला.”
हे भोजन एका अर्थाने अनोखे होते. कारण त्यात नेहमीप्रमाणे दिल्लीतील प्रतिष्ठीत लोकांसोबतच देशाच्या सर्वच भागातील प्रतिनिधी या विशेष समारोहात हजर होते. यावेळी विविध पद्म पुरस्कार विजेते आणि अनेक आदिवासी नेते उपस्थित होते.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com