शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती हवी – अजित पवार

NCP Leader Ajit Pawar Hadapsar Latest News Hadapsar News हडपसर मराठी बातम्या

Political will is needed to help farmers – Ajit Pawar

शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती हवी – अजित पवार

कांदा खरेदीाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार

NCP Leader Ajit Pawar Hadapsar Latest News Hadapsar News हडपसर मराठी बातम्या
File Photo

नाशिक: अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. फळबागांनाही मोठा फटका बसलाय. मात्र, अनेक ठिकाणी पिकांच्या नुकसानीचे पंचनामे अद्यापही झाले नसून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापही मदत मिळाली नसल्याचं विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते आज नाशिक इथं वार्ताहरांशी बोलत होते. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती हवी, अशी टीका त्यांनी केली.

शेतकऱ्यांना कांद्यासाठी प्रतिक्विंटल ५०० रुपये अनुदान देतील अशी अपेक्षा होती, मात्र राज्य सरकारनं शेतकऱ्यांना ३५० रुपयांचं अनुदान दिलं असून, हे अनुदान वाढवून देण्याची मागणी पवार यांनी यावेळी केली. नाशिकमध्ये नाफेडकडून कांद्याची खरेदी बंद झाली असून, ती पुन्हा सुरु व्हावी, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधणार असल्याचं पवार यांनी सांगितलं.

कांदा खरेदीाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार

कांदा खरेदी करण्यासाठी नाफेडची खरेदी केंद्र सुरु झाली नाहीत. 25 मार्चला अधिवेशन संपले आणि आज 30 तारीख आहे. नाशिकमध्ये नाफेडकडून कांद्याची खरेदी बंद झाली आहे. ती पुन्हा सुरु व्हावी, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासी संपर्क साधणार असल्याचे अजित पवार म्हणाले.

कांदा उत्पादनाचे मुख्य केंद्र म्हणून नाशिकचे ओळख आहे. त्यामुळं सरकारनं बंद झालेली कांदा खरेदी केंद्र सुरु करावी असे अजित पवार म्हणाले.सध्या काही ठिकाणी सरकारी हरभरा खरेदी केंद्र सुरु झाली आहेत. मात्र, आणखी हरभरा खरेदी केंद्र सुरु करण्याची गरज असल्याचे अजित पवार म्हणाले. राज्यात केळी, संत्रा, द्राक्ष बागांचेही मोठं नुकसान झालं आहे. अनेक शेतकऱ्यांना अद्याप मदत झाली नाही. तातडीनं शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे असे अजित पवार म्हणाले.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *