Successful launch of NVS 01 guidance satellite
एनव्हीएस ०१ या दिशादर्शक उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण
इस्रोने श्रीहरिकोटा येथून आपला पुढील पिढीचा नॅव्हिगेशनल उपग्रह – NVS-1 यशस्वीरित्या प्रक्षेपित केला
श्रीहरीकोटा : एनव्हीएस ०१ या दिशादर्शक उपग्रहाचं आज सकाळी श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरुन प्रक्षेपण करण्यात आलं जीएसएलव्ही एफ १२ या उपग्रह प्रक्षेपकाद्वारे हा उपग्रह अवकाशात सोडण्यात आला.
इस्रोच्या शास्त्रज्ञांनी आजच्या यशस्वी मोहिमेसह आणखी एक आव्हानात्मक प्रयोग सिद्ध केला आहे. केंद्रात जमलेल्या शास्त्रज्ञांनी उपग्रहाच्या आतापर्यंतच्या कामकाजावर आनंद आणि समाधान व्यक्त केले
या उपग्रहाबरोबर पहिल्यांदाच स्वदेशी बनावटीचं आण्विक घड्याळ वापरलं जाणार आहे. हा उपग्रह भारतीय नक्षत्र दिशादर्शक मालिकेचा एक भाग असून, निरीक्षण आणि दिशादर्शक क्षमता प्रदान करणं हे याचं उद्दिष्ट आहे. २ हजार २३२ किलोग्रॅम वजनाचा हा उपग्रह भारतीय नक्षत्र लिकेमधला दुसऱ्या पिढीतला पहिला दिशादर्शक उपग्रह आहे.
या उपग्रहाला येत्या दोन दिवसांत निर्धारित पातळीपर्यंत नेण्यासाठी कक्षा वाढवण्याच्या तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. या उपग्रहाद्वारे गोळा केलेल्या डेटाचा यक्तिक आणि धोरणात्मक कामासाठी वापर केला जाईल.
या मोहिमेमुळे केवळ नक्षत्र मालिकाच नव्हे तर स्वदेशी बनावटीचं रुबिडियम घड्याळ कार्यान्वित करणाऱ्या इतर तीन देशांच्या यादीत भारताचा समावेश होणार आहे. आजच्या यशस्वी मोहिमेमधून इस्रोच्या शास्त्रज्ञांनी आणखी एक कठीण प्रयोग सिद्ध केला आहे.
इस्रो मधील संचालकांनी सांगितले की GSLV मोहिमांच्या प्रक्षेपणात सुरुवातीला अडथळे आले असले तरी सरकारने GSLV मोहिमा पुढे नेण्यासाठी शास्त्रज्ञांना प्रोत्साहन दिले आणि पूर्ण पाठिंबा दिला.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com