नऊ महानगर पालिकांच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी प्रभागनिहाय मतदार याद्या १३ ऑगस्टला प्रसिद्ध करणार

सार्वत्रिक निवडणूका Elections हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Ward-wise voter lists for general elections of nine Municipal Corporations will be released on August 13

नऊ महानगर पालिकांच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी प्रभागनिहाय मतदार याद्या १३ ऑगस्टला प्रसिद्ध करणार

मुंबई : भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या तसेच 31 मे 2022 रोजी अस्तित्वात आलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत.सार्वत्रिक निवडणूका Elections हडपसर मराठी बातम्या  Hadapsar Latest News Hadapsar News

नऊ महानगर पालिकांच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी ((Municipal General Elections) प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या (Voter List) १३ ऑगस्टला प्रसिद्ध करण्यात येणार असून, त्यावर २२ ऑगस्टपर्यंत हरकती आणि सूचना दाखल करता येणार असल्याचं निवडणूक आयोगानं सांगितलं.

या नऊ महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकांसाठी सज्ज आहेत.

औरंगाबाद, लातूर, परभणी, चंद्रपूर, भिवंडी- निजामपूर, मालेगाव, पनवेल, मीरा-भाईंदर आणि नांदेड- वाघाळा या नऊ महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकांसाठी सज्ज आहेत.

प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या 2 सप्टेंबरला प्रसिद्ध करणार

निवडणूक आयोगानं तयार केलेल्या आणि ३१ मे २०२२ ला अस्तित्वात आलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार असून या मतदार याद्या प्रभागनिहाय विभाजित केल्यानंतर १३ ऑगस्टला प्रसिद्ध केल्या जातील.

त्यावर २२ ऑगस्टपर्यंत संबंधित ठिकाणी हरकती व सूचना दाखल करता येतील. प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या २ सप्टेंबरला प्रसिद्ध केल्या जातील.

या याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच याद्यांमध्ये मतदारांची नावे आणि पत्ते कायम ठेवले जातील. या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश, नावं वगळणं, अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणं इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही.

हरकती आणि सूचनांच्या अनुषंगानं केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या करण्यात येतात.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *