एकनाथ शिंदे शिवसेनेचे नव्हे भाजपाचे मुख्यमंत्री

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत Shiv Sena Leader and MP Sanjay Raut हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Eknath Shinde is BJP CM, not of Shiv Sena, says Sanjay Raut

एकनाथ शिंदे शिवसेनेचे नव्हे भाजपाचे मुख्यमंत्री – संजय राऊत यांची टीका

नाशिक: राज्यातलं सत्तारूढ एकनाथ शिंदे सरकार हे प्रत्यक्षात भाजपाचचं असून एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे नव्हे भाजपाचे मुख्यमंत्री आहेत अशी टीका शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी आज नाशिक इथं केली.

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत Shiv Sena Leader and MP Sanjay Raut हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News
File Photo

मुख्यमंत्री शिवसेनेचा असेल तर मंत्रिमंडळ ठरवण्यासाठी ते दिल्लीला का गेले, असा टोलाही राऊत यांनी लगावला.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शनिवारी शिंदे गटावर हल्ला चढवत एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री नसून भाजपचे मुख्यमंत्री असल्याचा दावा केला. राजकारणात टिकून राहण्यासाठी मी मृत्यूला प्राधान्य देईन पण भाजपपुढे शरण जाणार नाही, असे ते म्हणाले.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री भाजपचे आहेत. कर्नाटकात भाजपचा मुख्यमंत्री आहे. दिल्लीत भाजपची सत्ता आहे. बेळगावच्या सीमेचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना न्यायालयाचा आदेश येईपर्यंत बेळगावला केंद्रशासित प्रदेश बनवण्यास सांगावे. तो निर्णय घेऊन शिंदे यांनी महाराष्ट्रात परतावे,’’ असे शिंदे म्हणाले.

ठाकरे सरकार कोसळल्यापासून सीमाभागातील मराठी भाषिकांचे हाल होत असल्याची माहिती आम्हाला बेळगावच्या शिष्टमंडळाने दिली आहे.

शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दोन दिवसीय दिल्ली दौऱ्याचा संदर्भ देत राऊत म्हणाले , ‘मुख्यमंत्री शिवसेनेचा असेल तर मंत्रिमंडळ ठरवण्यासाठी दिल्लीला का गेला? शिवसेना हायकमांड मुंबईत आहे,’’

‘‘नवीन सरकार महाराष्ट्राचे विभाजन करून मुंबईला राज्यापासून वेगळे करण्यास आणि उद्योगांना इतर राज्यात स्थलांतरित करण्यास परवानगी देईल का?’’ असा सवाल त्यांनी केला.

नाशिक मधील शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा आज दुपारी झाला त्यावेळी ते बोलत होते. एका मोठ्या आर्थिक व्यवहारातून हे सरकार सत्तेवर आलं असून शिवसेनेला देशभरातून सहानुभूती आणि पाठिंबा मिळत आहे असंही ते म्हणाले.

शिवसेनेचं धनुष्य बाण हे पक्षचिन्ह कायम राहील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी जिल्हाप्रमुख विजय करंजकर, शहर प्रमुख सुधाकर बडगुजर तसचं संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *