राज्याच्या काही भागात अवकाळी पावसासह गारपीट, पिकांचं मोठं नुकसान झाल्याची भिती

In some parts of the state, hailstorms along with unseasonal rains have caused severe damage to crops

राज्याच्या काही भागात अवकाळी पावसासह गारपीट, पिकांचं मोठं नुकसान झाल्याची भिती

मुंबई : राज्याच्या काही भागात काल आणि आज अवकाळी पाऊस पडला. नंदुरबार जिल्ह्यात शहादा तालुक्यात काल संध्याकाळी गारपीटीसह झालेल्या अवकाळी पावसानं  पपई, केळी ,गहु ,हरभराWeather Forecast Image पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
जयनगर, वडाळी, बामखेडा, कोडावळ, खैरवे, बोराळे, निंभोरा अशा जवळपास ११ गावातील अकराशेहून अधिक शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे. प्रशासन आणि कृषी विभागानं पाहणीसह पंचनाम्याला देखील सुरुवात केली आहे. हवामान खात्यानं येत्या तीन दिवसात जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. आज देखील जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम आहे.

पालघर जिल्ह्य़ातल्या काही भागातही आज सकाळी पाऊस झाला. आज सलग दुसर्याा दिवशी धुळे शहर आणि जिल्हयात अवकाळी पाऊस सुरु आहे. रात्रभर धुळे शहरासह साक्री, शिरपूर, शिंदखेडा तालुक्यात पावसाची संततधार सुरु होती.
काल संध्याकाळी झालेल्या वादळी पावसात अंगावर वीज पडून धुळे तालुक्यात बोरसुले गावात एका विवाहितेचा मृत्यू झाला तर एक मुलगी जखमी झाली. त्या शेतात काम करताना ही घटना घडली, शिंदखेडा आणि साक्री तालुक्यातील अनेक गावांमध्ये गारपीट झाली असून कापणीला आलेला गहू, हरभरा, डांळीब, पपई पिकांचं नुकसान झालं आहे.मुंबईत आज हवामान अंशतः ढगाळ राहील. पावसाच्या एक-दोन सरी पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे.
Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *