Minister Chandrakant Patil inaugurated handloom textile display and sales stall
हातमाग कापड प्रदर्शन व विक्रीच्या स्टॉलचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई : महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळानी तयार केलेल्या विविध साहित्यांच्या स्टॉलचे उच्च, तंत्रशिक्षण व वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज मंत्रालयात उद्घाटन केले.
मंत्रालयात त्रिमूर्ती प्रांगणात दिवाळी निमित्त वस्त्रोद्योग विभागाच्यावतीने महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळांने तयार केलेल्या कापडाचे प्रदर्शन व विक्री स्टॉलचे आयोजन करण्यात आले आहे.
मंत्री श्री. पाटील यांनी प्रत्येक स्टॉलला भेट देऊन माहिती घेतली. सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
या प्रदर्शनात महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ मर्या. नागपूर (महाहॅण्डलूम) महाराष्ट्र, राज्य हातमाग सहकारी महासंघ मर्या, मुंबई (महाटेक्स), हिमरू शाल उत्पादक, छत्रपती संभाजीनगर, आसावली महिला हातमाग विणकर सहकारी संस्था पैठण, महिला बचत गटांनी तयार केलेले दिवाळीनिमित्त सजावट साहित्य, फराळ, सेंद्रिय शेतमाल उत्पादनाच्या साहित्यांचे स्टॉल येथे लावण्यात आले आहेत.
यावेळी वस्त्रोद्योग विभागाचे सचिव वीरेंद्र सिंग,उपायुक्त गोरक्ष गाडिलकर, उपसचिव श्रीकृष्ण पवार, उपसचिव श्रद्धा कोचरेकर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
हे ही अवश्य वाचा
श्वसन विकाराच्या रुग्णांसाठी सर ज.जी.समूह रुग्णालयात विशेष उपाययोजना
One Comment on “हातमाग कापड प्रदर्शन व विक्रीच्या स्टॉलचे मंत्रालयात उद्घाटन”