Harit Rakshabandhan at Sadhana Vidyalaya
साधना विद्यालयात हरित रक्षाबंधन
विद्यार्थ्यांनी केल्या कागद,कापड,बिया,कापूस,वाक यांचा वापर करून १०० पर्यावरणपूरक राख्या
हडपसर : साधना विद्यालय व आर. आर. शिंदे ज्युनिअर कॉलेजमधील राष्ट्रीय हरित सेनेतील विद्यार्थ्यांनी हरित रक्षाबंधन साजरे केले. विद्यार्थ्यानी रक्षाबंधनाचे औचित्य साधून कागद,कापड,बिया,कापूस,वाक यांचा वापर करून १०० पर्यावरणपूरक राख्या तयार केल्या होत्या. विद्यार्थ्यांनी विद्यालयातील झाडांना ओवाळून व औक्षण करून बनविलेल्या पर्यावरणपूरक राख्या झाडांना बांधून त्यांचे संवर्धन करण्याची व सुरक्षिततेची शपथ घेतली.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना,”वृक्षांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी हरित रक्षाबंधन महत्वाचे आहे.आजच्या काळात वाढते शहरीकरण,औद्योगिकीकरण व आर्थिक विकासाच्या नावाखाली प्रचंड वृक्षतोड होत आहे.परिणामी समृध्द जैवविविधता असलेली आपली भूमी ओसाड बनत चालली आहे.त्यामुळे प्रत्येकाने वृक्षारोपण करून त्यांचे संरक्षण व संवर्धन करणे गरजेचे आहे.निसर्ग स्वतः परिपूर्ण आहे.फक्त मानवी हस्तक्षेप रोखणे गरजेचे आहे”,असे मत साधना विद्यालय व आर.आर.शिंदे ज्यु.कॉलेजचे प्राचार्य दत्तात्रय जाधव यांनी व्यक्त केले.
या उपक्रमाचे आयोजन प्राचार्य दत्तात्रय जाधव, उपप्राचार्य डॉ. अमिरुद्दीन सिद्दीकी, उपमुख्याध्यापिका योजना निकम, पर्यवेक्षक शिवाजी मोहिते,कुमार बनसोडे, पर्यवेक्षिका माधुरी राऊत,विज्ञान विभाग प्रमुख डॉ. धनाजी सावंत, राष्ट्रीय हरित सेनेचे प्रमुख शैलेश बोरुडे, साधना खोत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “साधना विद्यालयात हरित रक्षाबंधन”