A preliminary meeting of the High-Level Committee on holding simultaneous elections in the country
देशात एकाचवेळी निवडणुका घेण्यासंदर्भातील उच्चस्तरीय समितीची प्राथमिक बैठक
नवी दिल्ली : 2 सप्टेंबर 2023 रोजीच्या अधिसूचनेद्वारे स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीची प्राथमिक बैठक आज माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. देशात एकाचवेळी निवडणुका घेण्याबाबत परीक्षण करण्यासाठी आणि त्यावर शिफारशी करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा, कायदा आणि न्याय मंत्रालय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) अर्जुन राम मेघवाल, राज्यसभेतील माजी विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, 15 व्या वित्त आयोगाचे माजी अध्यक्ष एन.के. सिंग, लोकसभेचे माजी सरचिटणीस डॉ. सुभाष सी. कश्यप आणि माजी मुख्य दक्षता आयुक्त संजय कोठारी या बैठकीला उपस्थित होते. ज्येष्ठ वकील हरीश साळवे हे या बैठकीत दूरदृश्य प्रणालीमार्फत सहभागी झाले. या बैठकीला लोकसभेतील सर्वात मोठ्या विरोधी पक्षाचे नेते अधीर रंजन चौधरी उपस्थित नव्हते.
उच्चस्तरीय समितीच्या सदस्यांचे स्वागत करताना समितीचे अध्यक्ष रामनाथ कोविंद यांनी बैठकीची विषयपत्रिका विशद केली.
समितीच्या कार्यपद्धतीची रूपरेषा सांगताना समितीने मान्यताप्राप्त राष्ट्रीय राजकीय पक्ष, राज्यांमध्ये सरकार असलेले राजकीय पक्ष, संसदेत प्रतिनिधी असलेले राजकीय पक्ष तसेच इतर मान्यताप्राप्त प्रादेशिक राजकीय पक्षांना एकाचवेळी देशात निवडणुका घेण्याच्या मुद्द्यावर सूचना/विचार मांडण्यासाठी आमंत्रित करण्याचा निर्णय घेतला. याशिवाय, ही समिती देशात एकाचवेळी निवडणुका घेण्याच्या मुद्द्यावर सूचना/ दृष्टिकोन मांडण्यासाठी भारतीय कायदा आयोगाला देखील आमंत्रित करणार आहे.
आभार प्रदर्शनाने या बैठकीची सांगता झाली..
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “देशात एकाचवेळी निवडणुका घेण्यासंदर्भातील समितीची बैठक”