Homeopathy practitioners with CCMP pass allowed to practice allopathy
‘सीसीएमपी’ उत्तीर्ण होमिओपॅथी व्यावसायिकांना ॲलोपॅथी व्यवसायाची परवानगी
मुंबई: महाराष्ट्रातील नोंदणीकृत होमिओपॅथी वैद्यक व्यावसायिकांना शासनमान्य सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी (सीसीएमपी) (Certificate Course in Modern Pharmacology) पूर्ण केल्यानंतर ॲलोपॅथी व्यवसाय करण्याची अधिकृत परवानगी मिळाली आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिली आहे.
सीसीएमपी कोर्स उत्तीर्ण व्यावसायिकांना आधुनिक वैद्यकशास्त्र (ॲलोपॅथी) वापरून रुग्णांवर उपचार करण्याचा अधिकार असणार आहे. तथापि, त्यासाठी काही अटी व नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
सीसीएमपी कोर्स आणि नियमांची अट
संबंधित होमिओपॅथी व्यावसायिक हे महाराष्ट्र समचिकित्सा वैद्यक व्यवसाय अधिनियमांतर्गत नोंदणीकृत असणे गरजेचे आहे. शासनमान्य सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी (सीसीएमपी) यशस्वीरित्या पूर्ण केलेले असावे.
औषध विक्रीसंबंधी मार्गदर्शक तत्त्वे
किरकोळ आणि घाऊक औषध विक्रेत्यांना सीसीएमपी उत्तीर्ण डॉक्टरांना ॲलोपॅथी औषधांचा पुरवठा करण्यास परवानगी आहे. परंतु, डॉक्टरांनी दिलेले प्रिस्क्रीप्शन तपासून त्यावर खालील तपशील असणे आवश्यक आहे:
- डॉक्टरांचा नोंदणी क्रमांक.
- सीसीएमपी कोर्स पूर्ण केल्याबाबतचे प्रमाणपत्र क्रमांक.
औषध विक्रेत्यांनी प्रिस्क्रीप्शनवरील या तपशीलांची पडताळणी केल्याशिवाय औषधांची विक्री करू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत. याबाबतची जबाबदारी औषध विक्रेत्यांची असेल.
व्यावसायिकांसाठी नवीन संधी
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे होमिओपॅथी व्यावसायिकांना ॲलोपॅथी उपचार पद्धतीचा अभ्यास व उपयोग करून आधुनिक वैद्यकीय क्षेत्रात योगदान देण्याची संधी उपलब्ध झाली आहे. तसेच, ग्रामीण भागातील वैद्यकीय सेवेच्या विस्तारासही मदत होईल.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
हे ही अवश्य वाचा
One Comment on “‘सीसीएमपी’ उत्तीर्ण होमिओपॅथी व्यावसायिकांना ॲलोपॅथी व्यवसायाची परवानगी”