सावित्रीबाई फुले विद्यापीठातील वसतिगृहे 21 फेब्रुवारीपासून खुली

Hostels of Savitribai Phule University will be opened from 21st February

सावित्रीबाई फुले विद्यापीठातील वसतिगृहे 21 फेब्रुवारीपासून खुली करण्यात येणार

पुणे : पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वसतिगृहे येत्या सोमवारपासून म्हणजेच 21 फेब्रुवारीपासून 50 टक्के क्षमतेनं खुली करण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने काल

Savitribai Phule Pune Universiy
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ.

अधिकृत पत्रकाद्वारे दिली.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर, प्रतिबंधक उपाय म्हणून विद्यापीठातील वसतिगृहे बंद ठेवण्यात आली होती.

मात्र, कोविड-19 चा प्रादुर्भाव सध्या कमी होत असल्यामुळे पीएचडी आणि स्पर्धा केंद्रातील विद्यार्थ्यासाठी वसतिगृह सुरू करण्यात येत आहे. वसतिगृहात प्रत्यक्ष राहायला येण्याआधी संबधीत विद्यार्थ्यानी लशीच्या दोन्ही मात्रा घेतले असणे आवश्यक आहे.

तसेच त्यांना शासन आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या कोविड 19 संदर्भातील मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे लागणार आहे. 

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *