HSC Board Exams Begin at Sadhana Kendra from February 21
साधना केंद्रावर 21 फेब्रुवारीपासून एच.एस.सी. बोर्ड परीक्षा
विज्ञान शाखेची बैठकव्यवस्था P020954 ते P022165
किमान कौशल्य विभाग P253621 ते P253712
हडपसर : एच.एस.सी. बोर्ड परीक्षा फेब्रुवारी /मार्च दि.21 फेब्रुवारी ते 16 मार्च अखेर साधना विद्यालय व आर.आर शिंदे ज्युनिअर कॉलेज हडपसर केंद्र क्रमांक 052 येथे विज्ञान व किमान कौशल्य शाखा 12 वी बोर्ड लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे.
या परीक्षेस एकूण 1309 परीक्षार्थी प्रविष्ठ होणार आहे.या केंद्रावर आर.आर शिंदे ज्युनिअर कॉलेज,आकुताई कल्याणी ज्युनिअर कॉलेज,एस.एम. जोशी महाविद्यालय,लोणकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,व एंजल मिकी माईन ज्युनिअर कॉलेज मधील विद्यार्थी प्रविष्ठ होणार आहेत.
आर. आर. शिंदे ज्युनियर कॉलेज मधील 12 वी काॅमर्स शाखेतील विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था आकुताई कल्याणी ज्युनिअर कॉलेज या केंद्रावर व 12 वी कला शाखेतील विद्यार्थ्याची बैठक व्यवस्था एस.एम.जोशी महाविद्यालय हडपसर या केंद्रावर करण्यात आली आहे.याची नोंद सर्व विद्यार्थी व पालक यांनी घ्यावी. असे आवाहन साधना विद्यालय व आर.आर शिंदे ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य दत्तात्रय जाधव यांनी केले.केंद्रचालक म्हणून प्राध्यापक धनाजी सावंत हे काम पाहणार आहेत.
साधना केंद्रावर विज्ञान शाखेची बैठकव्यवस्था P020954 ते P022165 तर किमान कौशल्य विभाग P253621 ते P253712 या परीक्षा क्रमांकाची राहणार आहे.
परीक्षार्थीना साधना विद्यालय व आर.आर शिंदे ज्युनिअर कॉलेजच्या वतीने परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
हे ही अवश्य वाचा
१९ फेब्रुवारी ते ४ मार्च दरम्यान विशेष मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोहीम
One Comment on “साधना केंद्रावर 21 फेब्रुवारीपासून एच.एस.सी. बोर्ड परीक्षा”