परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात मनाई आदेश लागू

Maharashtra SSC & HSC Board हडपसर मराठी बातम्या Hadapsar News

Prohibitory order applicable within a 100-meter area of the examination centre

परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात मनाई आदेश लागू

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता १२ वी) आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता १० वी) परीक्षेच्या पार्श्वभूमीवर आदेश लागूMaharashtra SSC & HSC Board हडपसर मराठी बातम्या Hadapsar News

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यामार्फत घेतल्या जाणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता १२ वी) आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता १० वी) परीक्षेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी १८ जुलै रोजी सकाळी ६ वाजल्यापासून ते ८ ऑगस्ट रोजी रात्रीच्या ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात ग्रामीण भागातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात मनाई आदेश लागू केले आहेत.

कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, परीक्षा केंद्रावर गैरप्रकार रोखण्यासाठी रोखण्याबरोबरच परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी हे आदेश लागू करण्यात आले आहेत. माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा केंद्राच्या परीसरात व त्यासभोवतालच्या १०० मीटर परिसरात परीक्षेशी संबंधित असलेल्या शिक्षक, अधिकारी, कर्मचारी आदी वगळून इतर कोणत्याही खाजगी व्यक्तींना परीक्षा केंद्रावर प्रवेश करण्याबरोबरच केंद्राच्या परिसरात दोन किंवा दोन पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास आदेशान्वये मनाई करण्यात आली आहे. हा आदेश संबंधित केंद्रावर परीक्षेस बसलेल्या परीक्षार्थी, परीक्षेसाठी नेमलेले अधिकारी किंवा कर्मचारी, पोलीस अधिकारी व कर्मचारी, सुरक्षा अधिकारी यांना लागू राहणार नाहीत.

परीक्षा केंद्राच्या सभोवतालच्या १०० मीटर परिसरातील सार्वजनिक टेलीफोन, एसटीडी, आयएसडी, बुथ, फॅक्स, झेरॉक्स केंद्रे, ई-मेल, इंटरनेट सुविधा, लॅपटॉप, भ्रमणध्वनी, प्रसार माध्यमे अथवा तत्सम संपर्क साधने बंद ठेवावीत. परीक्षा केंद्रांवर मोबाईल, वायरलेस सेट, ट्रॉझिस्टर, रेडिओ, कॅलक्युलेटर, लॅपटॉप व तत्सम इतर साधने परीक्षा केंद्रावर जवळ बाळगण्यास व परिसराचे १०० मीटर सभोवतालच्या परिसरात वापरण्यास मनाई असेल. या आदेशाचे उल्लघंन करणाऱ्यांना व्यक्तींना भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम १८८ नुसार दंडनियम, कायदेशीर कारवाईस पात्र राहतील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
पीक विमा योजनेमध्ये ६६ लाख शेतकऱ्यांचा सहभाग
Spread the love

One Comment on “परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात मनाई आदेश लागू”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *