ICC U-19 विश्वचषक: भारताने बांगलादेशचा 5 गडी राखून पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

ICC U-19 World Cup: India beat Bangladesh by 5 wickets to enter the semi-final.

ICC U-19 विश्वचषक: भारताने बांगलादेशचा 5 गडी राखून पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

अँटिग्वा : आयसीसी अंडर-19 क्रिकेट विश्वचषकात, काल रात्री अँटिग्वा येथे झालेल्या सुपर लीगच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताने बांगलादेशचा पाच गडी राखून पराभव करत ऑस्ट्रेलियाशी उपांत्य फेरीत धडक मारली.ICC U-19 World Cup: India beat Bangladesh by 5 wickets to enter semi-final

प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशचे फलंदाज 37.1 षटकात 111 धावांवर सर्वबाद झाले. भारताचा वेगवान गोलंदाज रवी कुमारने तीन तर फिरकी गोलंदाज विकी ओस्तवालने दोन बळी घेतले.

प्रत्युत्तरात भारताने आंगक्रिश रघुवंशीच्या 44 आणि शेख रशीदच्या 26 धावांच्या जोरावर विजयाचे लक्ष्य अवघ्या 30.5 षटकांत पाच गडी गमावून पार केले. बांगलादेशकडून रिपन मंडोलने चार विकेट्स घेतल्या.

भारतीय अंडर-19 कर्णधार यश धुलने बांगलादेश अंडर-19 विरुद्ध नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

या विजयासह येत्या बुधवारी होणाऱ्या उपांत्य सामन्यात भारताची गाठ ऑस्ट्रेलियाबरोबर पडणार आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *