Inauguration of CT Scan Inspection Center at Manchar
सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते मंचर येथे सी.टी.स्कॅन तपासणी केंद्राचे उद्घाटन
पुणे : सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते उप जिल्हा रुग्णालय मंचर येथे अत्याधुनिक सी.टी.स्कॅन तपासणी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी तहसीलदार संजय नागटिळक, गटविकास अधिकारी प्रमिला वाळुंज, उप जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिवाजीराव जाधव, रुग्ण कल्याण समिती सदस्य डी.के.वळसे पाटील, शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, कृष्णा डायग्नोस्टिक केंद्राचे डॉ. परीमल सावंत, डॉ. संजयकुमार भवारी आदी उपस्थित होते.
श्री. वळसे पाटील म्हणाले, सर्वसामान्य नागरिकांना लाभ व्हावा यासाठी या तपासणी केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. येथे उपजिल्हा रुग्णालयातील रुग्ण तसेच बाह्य रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच दुर्धर आजाराची पूर्व तपासणी केली जाणार आहे. गरजू नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
सार्वजनिक आरोग्य विभाग व क्रस्ना डायग्नोस्टिक सेंटर यांच्या संयुक्त विद्यामाने सार्वजनिक खासगी तत्वावर या सीटी स्कॅन तपासणी केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. सी.टी.स्कॅन केंद्राचा या परिसरातील नागरिकांना लाभ होणार आहे, असेही श्री. वळसे-पाटील म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. जाधव यांनी केले.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “मंचर येथे सी.टी.स्कॅन तपासणी केंद्राचे उद्घाटन”