Workshop on Industry and Government Networking for Inclusive Transformation and Environment organized on November 7
इंडस्ट्री ॲण्ड गव्हर्न्मेन्ट नेटवर्किंग फॉर इनक्ल्युजीव्ह ट्रान्स्फॉर्मेशन ॲण्ड इनव्हायर्मेन्ट या कार्यशाळेचे ७ नोव्हेंबर रोजी आयोजन
उद्योग विभागातर्फे ७ नोव्हेंबर रोजी कार्यशाळेचे आयोजन; उद्योजक, निर्यातदारांना सहभाग नोंदविण्याचे आवाहन
मुंबई : उद्योग विभागातर्फे मंगळवार ७ नोव्हेंबर २०२३ रोजी सानेगुरुजी विद्यालयात ( भिकोबा वामन पठारे मार्ग, दादर कॅटरिंग महाविद्यालयाजवळ, शिवाजी पार्क, दादर (प.), मुंबई) सकाळी १० ते सायंकाळी ६ यावेळेत सीडबी (SIDBI), आयडीबीआय (IDBI) या संस्थांच्या सहकार्याने एकदिवसीय इंडस्ट्री ॲण्ड गव्हर्न्मेन्ट नेटवर्किंग फॉर इनक्ल्युजीव्ह ट्रान्स्फॉर्मेशन ॲण्ड इनव्हायर्मेन्ट या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे, असे मुंबई प्राधिकरण विभागाचे उद्योग उपसंचालक यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.
राज्यासाठी महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम क्षेत्रावर अधिक भर देऊन त्यांची कार्यक्षमता व उत्पादन वाढविणे, राज्यात उद्योजकीय वातावरण अधिक व्यापक करून रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करणे, उद्योगाच्या विकासाकरीता राज्य तसेच केंद्र शासनाचे विविध विभागांचे उपक्रम व योजना उद्योग संचालनालयामार्फत राबविण्यात येत आहेत.
सर्व उद्योजकांना या योजनांची माहिती एकाच व्यासपीठावर उपलब्ध होण्याच्या दृष्टीने संबंधित सर्व विभागांच्या सहकार्याने इंडस्ट्री ॲण्ड गव्हर्न्मेन्ट नेटवर्किंग फॉर इनक्ल्युजीव्ह ट्रान्स्फॉर्मेशन ॲण्ड इनव्हायर्मेन्ट (IGNITE MAHARASHTRA) याविषयावर राज्यस्तरीय कार्यशाळा होईल. मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर अध्यक्षस्थानी असतील.
या कार्यशाळेस उद्योजक, निर्यातदारांनी उपस्थित राहावे. उपस्थितीबाबत उद्योग सहसंचालक, मुंबई प्रादेशिक विभाग, चेंबूर, मुंबई किंवा मोबाईल क्रमांक ९५९४३८१२६६ यावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “इंडस्ट्री ॲण्ड गव्हर्न्मेन्ट नेटवर्किंग फॉर इनक्ल्युजीव्ह ट्रान्स्फॉर्मेशन ॲण्ड इनव्हायर्मेन्ट या कार्यशाळेचे आयोजन”