Innovation Day 2023′ at Savitribai Phule Pune University
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘ इनोवेशन डे २०२३’ चे आयोजन
पुणे : माजी राष्ट्रपती आणि महान शास्त्रज्ञ डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त शनिवारी (१४ ऑक्टोबर) सावित्रीबाई फुले पुणे विद्यपीठात ‘इनोवेशन डे २०२३’ चे आयोजन करण्यात आले आहे.
विद्यापीठाच्या रिसर्च पार्क फाउंडेशनतर्फे आयोजित या कार्यक्रमात विज्ञानातील नवनविन संकल्पनांवर दिवसभर चर्चा होणार आहे. यावेळी विज्ञान, तंत्रज्ञान, व्यवसाय या विषयातील तज्ज्ञ आपापल्या क्षेत्रातील ताज्या घडामोडींवर चर्चेतून, सादरीकरणातून प्रकाश टाकतील. तसेच या निमित्त आयोजित तंत्रज्ञान प्रदर्शनात तुम्हाला विज्ञानाचे विविध प्रयोग बघायला मिळणार आहे.
विज्ञानाची गोडी असलेल्या विद्यार्थ्याद्वारे करण्यात आलेले विज्ञानाचे नवनवे प्रात्यक्षिकही तुम्हाला येथे अनुभवता येणार आहेत. हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून रिसर्च पार्क फाउंडेशनच्या हॉलमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमास विज्ञान आणि उद्योगातील प्रगती जाणून घेण्यासाठी उत्सुक असलेल्या सर्वांनी भेट द्यावी, असे आवाहन फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com