Illegal assets of sugar factories confiscated
साखर कारखान्यातील बेकायदेशिर मालमत्ता जप्त
नागपूर : नागपूर जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यातल्या राम गणेश गडकरी साखर कारखान्याची बेकायदेशिर लिलावातील १३ कोटी ४१ रूपयांची मालमत्ता, सक्तवसुली संचालनालय- ईडीनं जप्त केली आहे.
ईडीनं काल ट्.विट करुन ही माहिती दिली. महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या लिलावात हा साखर कारखाना अतिशय कमी किंमतीत विकला गेला होता.
अहमदनगर जिल्ह्यातले राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी हा साखर कारखाना विकत घेतला होता.
या कारवाईत ईडीनं साखर कारखान्याच्या मालकीची ९० एकर शेत जमिन आणि जवळपास साडेचार एकर अकृषिक जमिनही जप्त केली आहे.