Inauguration of Western Division Museum of Medicinal Plants at Savitribai Phule Pune University
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पश्चिम विभागीय औषधी वनस्पतींच्या संग्रहालयाचे उद्घाटन
प्रगतीशील शेतकऱ्यांना ‘औषधी किसान सन्मान’ प्रदान
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कार्यरत असणाऱ्या आयुष मंत्रालयाच्या पश्चिम विभागीय सहसुविधा केंद्राच्या वतीने औषधी वनस्पतींची लागवड करणाऱ्या निवडक प्रगतीशील शेतकऱ्यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ.नितीन करमळकर यांच्या हस्ते औषधी किसन सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला.
राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ, आयुष मंत्रालय भारत सरकार यांची सात केंद्र असून त्यातील विद्यापीठात असणाऱ्या केंद्राची आढावा बैठक २१ फेब्रुवारी रोजी घेण्यात आली. यावेळी जयपूरच्या राष्ट्रीय आयुर्वेद संस्थान येथील अधिष्ठाता प्रा. मिता कोटेचा, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. अविनाश आडे, विभागीय केंद्राचे प्रमुख संशोधक प्रा.डॉ.दिगंबर मोकाट आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी सहसुविधा केंद्रात औषधी वनस्पतींचे संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी पुरस्कृत करण्यात आलेल्या शेतकऱ्यांमध्ये अश्वगंधा उत्पादक जनकीलाल जाट, तुळस उत्पादक हेमंत पटेल, सफेद मुसळी उत्पादक विनायक येऊल व जयेश मोकाशी, चंदन उत्पादक राजेंद्र गाडेकर, सामुहिक शेतीचे प्रोत्साहक सुभाष थोरात आदींचा यावेळी सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात आयुष मंत्रालयातील सरकारी अधिकाऱ्यांचाही गौरव करण्यात आला.