Youth should work to increase the glory of the country
देशाचा गौरव वाढवण्यासाठी युवकांनी कार्य करावे
-दिलीप आबा तुपे
हडपसर: आज आपण स्वातंत्र्य उपभोगतो आहोत परंतु स्वातंत्र्यसैनिक आणि क्रांतीकारक यांच्या त्यागाचे स्मरण करून आपण देशाच्या प्रगतीसाठी कार्य करावे. अभ्यासाबरोबर विविध क्षेत्रात ,स्पर्धा परीक्षा,खेळ व सांस्कृतिक बाबतीत यश मिळवावे असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे जनरल बाॅडी सदस्य दिलीप आबा तुपे यांनी केले.साधना विद्यालयात आयोजित स्वातंत्र्यदिन कार्यक्रमाच्या निमित्ताने ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला ध्वजारोहण करण्यात आले.ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत,ध्वजगीत व महाराष्ट्र राज्यगीत सादर करण्यात आले. यानंतर ध्वजास व पाहुण्यांना एन.सी.सी.,आर.एस.पी.व स्काऊट छात्रांनी मानवंदना दिली.
याप्रसंगी आयर्नमॅन,ज्येष्ठ उद्योजक दशरथ जाधव, एस.एम.जोशी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नानासाहेब गायकवाड,साधना विद्यालय व आर.आर शिंदे ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य दत्तात्रय जाधव ,माजी प्राचार्य विजय शितोळे, इंग्लिश मीडियमच्या मुख्याध्यापिका रोहिणी सुशीर,मुख्याध्यापिका लक्ष्मी आहेर,उपमुख्याध्यापिका योजना निकम,उपप्राचार्य डाॅ. अमिरुद्दीन सिद्दीकी, पर्यवेक्षक शिवाजी मोहिते , कुमार बनसोडे,माधुरी राऊत ,आजीव सभासद लालासाहेब खलाटे,आजीव सेवक अनिल मेमाणे,ज्युनियर कॉलेज विभागप्रमुख पांडूरंग गाडेकर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या निमित्ताने मान्यवरांच्या शुभहस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.व शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. स्वातंत्र्यदिन कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नृत्याचे सादरीकरण केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय जाधव यांनी केले.तर ध्वजसंचलन R.S.P जिल्हा समादेशक रमेश महाडीक यांनी केले.कार्यक्रमाचे निवेदन अनिल वाव्हळ व प्रतापराव गायकवाड यांनी केले.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com