Central Government announces to increase the interest rate of Employees Provident Fund to 8.10%
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचा व्याजदर ८.१० दशांश टक्के करण्याची केंद्रसरकारची घोषणा
गुवाहाटी: केंद्रीय कामगार मंत्री, भूपेंद्र यादव यांनी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी २०२१-२०२२ साठी ८ पूर्णांक १० दशांश टक्के व्याजदर आज जाहीर केला. गुवाहाटी इथं केंद्रीय विश्वस्त मंडळाची २३० वी बैठक यादव यांच्या अध्यक्षतेखाली सुरू होती तेव्हा ते बोलत होते. दुर्धर रोगांच्या अभ्यासासाठी केंद्रं स्थापन केली जातील असंही त्यांनी सांगितलं.
हॉस्पिटल प्रकल्पांच्या चालू बांधकामावर लक्ष ठेवण्यासाठी, ESIC म्हणजेच राज्य कामगार विमा योजने मध्ये एक डॅशबोर्ड देखील विकसित केला गेला आहे. त्यामुळे पेन्शन आणि कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या दाव्यांची प्रकरणे निकाली काढण्याची क्षमता वाढली आहे, असंही ते म्हणाले. यावेळी आसामचे मुख्यमंत्री आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना आसामचे मुख्यमंत्री डॉ. हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, असंघटित क्षेत्रातील कामगार आणि मजुरांच्या हितासाठी ईपीएफओ मोठी भूमिका बजावत आहे.
कामगार आणि रोजगार आणि पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूचे राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी माहिती दिली की आसाममधील 64 लाखांहून अधिक लोकांनी ई-श्रम पोर्टलवर आपली नोंदणी केली आहे.