U19 World Cup 2022 Final: India beat England to win a record fifth title.
U19 विश्वचषक 2022 फायनल: भारताने इंग्लंडला हरवून विक्रमी पाचवे विजेतेपद पटकावले.
अँटिग्वा : शेख रशीद आणि निशांत सिंधू यांनी 190 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अर्धशतक ठोकले आणि भारताने इंग्लंडचा 4 गडी राखून पराभव करून अँटिग्वा येथे विक्रमी पाचव्या अंडर 19 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले. तत्पूर्वी, राज बावाने 5 बळी घेतले तर रवी कुमारने 4 बळी घेत इंग्लंडला 189 धावांत गुंडाळले.
शनिवारी अँटिग्वा येथे चंदीगडच्या राज अंगद बावाच्या सनसनाटी अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारतानेअंतिम सामन्यात इंग्लंडचा चार विकेट्सनी पराभव करून पाचव्यांदा अंडर-19 क्रिकेट विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले.
बावाने सनसनाटी 5 बळी घेत (5/31)गोलंदाजीत चमक दाखवून भारताने इंग्लंडला 189 धावांत गुंडाळण्यास मदत केली आणि भारताने 2.2 षटके बाकी असताना 190 धावांचे लक्ष्य पार पाडले.
22000, 2008, 2012, 2018 मध्ये विजेतेपद पटकावणाऱ्या भारतासाठी ही एक उल्लेखनीय कामगिरी होती, कारण आयर्लंड विरुद्ध सामनाच्या आधी संघ परिस्थितीत सापडला होता की जिथे अनेक खेळाडूंना त्यांच्या सामन्याच्या काही तास आधी कोविड-19 ची लागण झाल्यामुळे ते प्लेइंग इलेव्हनसाठी मैदानात उतरूशकत नव्हते. या परिस्थितीमघ्ये सुद्धा संघाने अंतिम फेरी पर्यंत धडक मारली होती.
तत्पूर्वी, इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र भारताच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच सामन्यावर वचर्स्व दाखवत इंग्लंडचे दोन गडी झटपट बाद केलं. वेगवान गोलंदाज बावा (9.5 षटकांत 5/31) आणि रवी कुमार (9 षटकांत 4/34) यांच्या बळावर भारताने 44.5 षटकांत 189 धावांवर त्यांना बाद केले. 25 व्या षटकात इंग्लंडची अवस्था 7 बाद 91 अशी झाली होती परंतु जेम्स रीयूने एकट्याने 116 चेंडूत 95 धावा करून त्यांचा डाव पुन्हा जिवंत केला आणि त्यांच्या संघाला 200 धावांपर्यंत मजल मारता आली.