संरक्षण सहकार्य बळकट करण्यासाठी भारत आणि अमेरिका दरम्यान आग्रा येथे 19 वी लष्करी सहकार्य बैठक

India & US hold 19th Military Cooperation meeting in Agra to strengthen defense cooperation

संरक्षण सहकार्य बळकट करण्यासाठी भारत आणि अमेरिका दरम्यान आग्रा येथे 19 वी लष्करी सहकार्य बैठकIndia & US hold 19th Military Cooperation meeting in Agra

नवी दिल्‍ली :  भारत-अमेरिका  लष्करी सहकार्य गटाची  (एमसीजी ) 19 वी बैठक 1आणि 2 मार्च 2022 रोजी उत्तरप्रदेशात आग्रा येथे संपन्न झाली.

भारताकडून चीफ ऑफ इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ टू  द चेअरमन चिफ्स ऑफ स्टाफ कमिटीचे  (सीआयएससी ) प्रमुख एअर मार्शल बी. आर कृष्णा आणि अमेरिकेच्या यूएस इंडो-पॅसिफिक कमांडचे डेप्युटी कमांडर लेफ्टनंट जनरल स्टीफन डी स्केल्न्का यांच्या सह -अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.

या चर्चेत दोन्ही देशांदरम्यानच्या  विद्यमान  संरक्षण संबंधांना बळकटी देण्यावर भर देण्यात आला त्याचप्रमाणे विद्यमान सहकार्य यंत्रणेच्या कक्षेत नवीन उपक्रम राबवण्यासंदर्भात विचारविनिमय करण्यात आला.

भारत-अमेरिका  लष्करी सहकार्य गट हा उभय देशातील इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ आणि यूएस इंडो-पॅसिफिक कमांड या मुख्यालयांदरम्यानच्या   धोरणात्मक आणि कार्यान्वयन  स्तरावरील  नियमित चर्चेद्वारे देशांमधील  संरक्षण सहकार्याच्या प्रगतीसाठी स्थापन केलेला  एक मंच आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *