भारत विरुद्ध इंग्लंड क्रिकेट सामन्यात भारत 5 बाद 326

India vs England cricket test match India 326 runs for 5 wickets भारत विरुद्ध इंग्लंड क्रिकेट कसोटी सामन्यात भारताच्या 5 गडी बाद 326 धावा हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News, Hadapsar Latest News

India vs England cricket test match India 326 runs for 5 wickets

भारत विरुद्ध इंग्लंड क्रिकेट कसोटी सामन्यात भारताच्या 5 गडी बाद 326 धावा

रोहितची शतकाला गवसणी घातली

इंग्लंडकडून मार्क वूडने तीन गडी केले बाद

India vs England cricket test match India 326 runs for 5 wicketsभारत विरुद्ध इंग्लंड क्रिकेट कसोटी सामन्यात भारताच्या 5 गडी बाद 326 धावा
हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News, Hadapsar Latest News
Source : https://www.bcci.tv/

राजकोट : भारत विरुद्ध इंग्लंड क्रिकेट कसोटी मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यात आज दिवसअखेर भारताच्या 5 गडी बाद 326 धावा झाल्या होत्या. राजकोट इथं सुरु झालेल्या या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

या सामन्यात भारताला यशस्वी जयस्वालच्या रुपाने पहिला धक्का बसला. मागील कसोटीत द्विशतक ठोकणाऱ्या यशस्वी जयस्वालला या सामन्यात फक्त 10 धावाच करता आल्या. मार्क वूडने त्याला बाद करुन भारताला पहिला झटका दिला. जयस्वाल बाद झाला त्यावेळी भारताची अवस्था 1 बाद 22 अशी होती.

यानंतर मग मागच्या सामन्यातील शतकवीर शुभमन गिल मैदानात आला. मात्र त्याला या सामन्याच्या पहिल्या डावात भोपळाही फोडता आला नाही. वूडनेच त्याला शून्यावर बाद केलं. मग फलंदाजीसाठी आलेल्या रजत पाटीदारकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. पण त्यानेही भ्रमनिराश केला. रजत पाटीदारला हार्टलीने अवघ्या 5 धावांवर माघारी धाडून,

भारताचे 3 गडी अवघ्या 33धावांवर बाद झाले. मात्र नंतर कर्णधार रोहित शर्मा आणि रविंद्र जाडेजा यांची वैयक्तिक शतकं आणि द्विशतकी भागीदारी यातून भारताचा डाव सावरला.

रोहितने 157 चेंडूत 11 चौकार आणि 2 षटकारांसह शतकाला गवसणी घातली. रोहित शर्माचं हे कसोटीतील 11 वे शतक आहे. याआधीच्या दोन्ही कसोटी सामन्यात रोहितला विशेष अशी कामगिरी करता आली नव्हती. ती कसर रोहित शर्माने या कसोटीत भरुन काढली.

रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा यांच्यातील भागीदारी हे ठळक वैशिष्ट्य होते, ज्याने फलंदाजीमध्ये उत्कृष्ट दर्जाचे प्रदर्शन केले. त्यांनी एकत्रितपणे 204 धावांची भागीदारी केली आणि दोन्ही खेळाडूंनी शतके झळकावली. मार्क वूडच्या शॉर्ट बॉलच्या डावपेचाला अखेर फळ मिळाले आणि कर्णधार शर्माची विकेट घेतली.

नवोदित सर्फराज खानने ही 62 धावा फटकावल्या. अंतिम सत्रात सरफराज खानने पदार्पणातच केवळ 66 चेंडूत 62 धावा करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले, जरी त्याची आशादायक खेळी रनआउटने झाली, मार्क वुडने त्याच्या बाद होण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. इंग्लंडकडून मार्क वूडने तीन गडी बाद केले. पाच सामन्यांच्या या कसोटी मालिकेतला प्रत्येकी एक सामना दोन्ही संघांनी जिंकला आहे.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा

‘एमटीडीसी’चा ‘जबाबदार पर्यटन’ उपक्रम ‘स्कोच’ पुरस्काराने सन्मानित

Spread the love

One Comment on “भारत विरुद्ध इंग्लंड क्रिकेट सामन्यात भारत 5 बाद 326”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *