यंदाच्या इफ्फीमध्ये इंडिअन पॅनोरमाअंतर्गत AQ25 फिचर आणि 20 नॉन फिचर फिल्म्स दाखवल्या जाणार

International Film Festival of India भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

AQ25 feature and 20 non-feature films will be screened under Indian Panorama at this year’s IFFI.

यंदाच्या इफ्फीमध्ये इंडिअन पॅनोरमाअंतर्गत AQ25 फिचर आणि 20 नॉन फिचर फिल्म्स दाखवल्या जाणार

54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) 2023 इंडिअन पॅनोरमाअंतर्गत दाखवल्या जाणाऱ्या चित्रपटांची घोषणा

इंडिअन पॅनोरमाअंतर्गत फिचर फिल्म वर्गवारीचा उद्घाटनीय चित्रपट म्हणून ‘अट्टम’ या मल्याळम चित्रपटाची निवड

इंडिअन पॅनोरमाअंतर्गत नॉन फिचर फिल्म वर्गवारीचा उद्घाटनीय चित्रपट म्हणून ‘एंड्रो ड्रीम्स’ या मणिपुरी चित्रपटाची निवड

नवी दिल्‍ली : भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (इफ्फी) एक मुख्य घटक असलेल्या ‘इंडियन पॅनोरमा’अंतर्गत दाखवल्या जाणार असलेल्या 25 फिचर फिल्म्स आणि 20 नॉन फिचर फिल्म्सची निवड प्रक्रिया पूर्ण झाली असल्याची घोषणा इंडियन पॅनोरमाने केली आहे. गोव्यामध्ये 20 ते 28 नोव्हेंबर 2023 या काळात होत असलेल्या 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) हे निवडक चित्रपट दाखवले जाणार आहेत.International Film Festival of India
भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी)
हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या भारतीय चित्रपट विकास महामंडळाच्यावतीनं (नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन) इंडियन पॅनोरमाचं आयोजन केलं जातं. इंडियन पॅनोरमाअंतर्गत आखलेल्या नियमांमध्ये नमूद अटी आणि कार्यपद्धतीनुसार सिनेमॅटिक, थिमॅटिक आणि सौंदर्यशास्त्रीय पातळीवर उत्कृष्ट असतील अशा फिचर नॉन फिचर फिल्म्सची निवड करणे हे यामागचं उद्दिष्ट आहे.

‘इंडियन पॅनोरमा’ अंतर्गत दाखवल्या जाणाऱ्या चित्रपटांची निवड संपूर्ण भारतातील सिनेजगतातील नामवंत व्यक्तींच्या मार्फत केली जाते. यात फिचर फिल्म्ससाठी एकूण बारा सदस्य तर नॉन-फिचर फिल्म्ससाठी सहा सदस्य ज्युरी म्हणून काम पाहतात. हे सर्व ज्युरी, सदस्य आणि संबंधित अध्यक्षांच्या नेतृत्वातील निवड समिती चित्रपटांची निवड करतात. आपल्या वैयक्तिक ज्ञान कौशल्याचा वापर करून, ही नामवंत व्यक्तिमत्वांची निवड समिती एकसमान योगदान देत, एकमतानं चित्रपटांची निवड करते. त्यातूनच इंडिअन पॅनोरमा अंतर्गतच्या विविध वर्गवारीत सर्वोत्कृष्ट चित्रपटांची निवड केली जाते.

फिचर फिल्म्स

बारा सदस्यांचा समावेश असलेल्या यंदाच्या या फीचर फिल्म ज्युरींचं नेतृत्व, निवड समितीचे अध्यक्ष, प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, अभिनेता आणि निर्माता डॉ. टी. एस. नागभरणा यांनी केलं. या बारा सदस्यांमध्ये वैयक्तिक पातळीवर अनेक प्रसिद्ध चित्रपटांमध्ये, तसंच चित्रपटांशी संबंधित व्यवसायांमध्ये प्रतिनिधीत्व करत असलेल्या खाली दिलेल्या व्यक्तीमत्वांचा समावेश होता. महत्वाचं म्हणजे हे सगळे ज्युरी सदस्य आपल्या व्यवसायातल्या बहुविविधतेचं प्रतिनिधीत्व करणारी व्यक्तीमत्वं आहेत.

ए. कार्तिक राजा; सिनेमॅटोग्राफर / छायाचित्रणकार
अंजन बोस; चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता
डॉ.इतराणी सामंता; चित्रपट निर्माता आणि पत्रकार
के पी व्यासन; चित्रपट निर्माता, दिग्दर्शक आणि पटकथा लेखक
कमलेश मिश्रा; चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक
किरण गंटी; चित्रपट संपादक आणि दिग्दर्शक
मिलिंद लेले; चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता
प्रदिप कुरबा; चित्रपट दिग्दर्शक
रमा विज; अभिनेत्री
रोमी मीतेई; चित्रपट दिग्दर्शक
संजय जाधव; चित्रपट दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर / छायाचित्रणकार
विजय पांडे; चित्रपट दिग्दर्शक आणि संपादक
54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) इंडियन पॅनोरमा विभागातल्या फिचर फिल्मच्या वर्गवारीकरता एकूण 408 प्रवेशिका आल्या होत्या. त्यातून वैशिष्ट्यपूर्ण 25 चित्रपटांचे पॅकेज निवडण्यात आले आहे. निवडलेले हे 25 चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीच्या बहुरंगी आणि विविधतेचे दर्शन घडवणारे चित्रपट आहेत.

इंडियन पॅनोरमा 2023 च्या फिचर फिल्म्स या वर्गवारीचा उद्घाटनीय चित्रपट म्हणून निवडसमितीनं आनंद एकार्शी दिग्दर्शित ‘अट्टम’ या मल्याळम चित्रपटाची एकमतानं निवड केली आहे.

नॉन फिचर फिल्म्स

यंदाच्या सहा सदस्यांचा समावेश असलेल्या नॉन फीचर फिल्म ज्युरींचं नेतृत्व, या निवडसमीतीचे अध्यक्ष प्रख्यात माहितीपट दिग्दर्शक अरविंद सिन्हा यांनी केलं. या सहा सदस्यांमध्ये वैयक्तिक पातळीवर अनेक प्रसिद्ध चित्रपटांमध्ये, तसंच चित्रपटांशी संबंधित व्यवसायांमध्ये प्रतिनिधीत्व करत असलेल्या खाली दिलेल्या व्यक्तीमत्वांचा समावेश होता. महत्वाचं म्हणजे हे सगळे ज्युरी सदस्य आपल्या व्यवसायातल्या बहुविविधतेचं प्रतिनिधीत्व करणारी व्यक्तीमत्वं आहेत :

  1. अरविंद पांडे; चित्रपट दिग्दर्शक आणि लेखक
  2. बॉबी वाहेंगबम; चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता
  3. दिप भुयान, चित्रपट दिग्दर्शक
  4. कमलेश उदासी; चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता
  5. पौशाली गांगुली; अॅनिमेटर, चित्रपट दिग्दर्शिका आणि पटकथा लेखिका
  6. वरुण कुर्तकोटी; चित्रपट दिग्दर्शक

54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) इंडियन पॅनोरमा विभागातअंतर्गत दाखवल्या जाणाऱ्या समकालीन नॉन फिचर फिल्म या वर्गवारीकरता एकूण 239 प्रवेशिका आल्या होत्या. त्यातून 20 चित्रपटांची निवड करण्यात आली. निवडलेल्या या 20 चित्रपटांमधून भारतातील उदयोन्मुख आणि प्रस्थापित चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांच्या एखादा विषयाचे ध्वनीचित्रफितीच्या माध्यमातून दस्तऐवजीकरण करणे, त्या त्या विषयांसाठी संशोधन करणे आणि त्याचवेळी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासंबंधीच्या क्षमतेचे दर्शन घडते आणि ते समकालीन भारतीय मूल्ये देखील प्रतिबिंबित करतात.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
प्रधानमंत्री स्वनिधी’चा लाभ लाभार्थींपर्यंत पोहोचवा
Spread the love

One Comment on “यंदाच्या इफ्फीमध्ये इंडिअन पॅनोरमाअंतर्गत AQ25 फिचर आणि 20 नॉन फिचर फिल्म्स दाखवल्या जाणार”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *