India’s victory over Pakistan by 107 runs in the Women’s Cricket World Cup
महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानवर १०७ धावांनी मात करत भारताची विजयी सलामी
न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत, आज भारतानं पाकिस्तानविरुद्धचा आपला सलामीचा सामना १०७ धावांनी जिंकला. आजच्या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून पहिली फलंदाजी करायचा निर्णय घेतला. त्यानंतर सलामीला आलेली स्मृती मंधाना हिच्यासह स्नेहा राणा आणि पुजा वस्त्रकार यांच्या अर्धशतकी खेळींच्या जोरावर भारतानं निर्धारीत ५० षटकांमध्ये ७ गडी बाद २४४ धावा केल्या.
या धावसंख्येचा पाठलाग करतांना, पाकिस्तानचा संपूर्ण संघ ४३ षटकांमध्ये १३७ धावांततच माघारी परतला.
भारताच्या राजेश्वरी गायकवाड हिनं ४, झुलन गोस्वामी आणि स्नेहा राणा यांनी प्रत्येकी २, तर मेघना सिंग आणि दिप्ती शर्मा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.पुजा वस्त्रकार हिला सामनावीराच्या पुरस्कारानं गौरवलं गेलं. स्पर्धेतला भारताचा पुढचा सामना येत्या १० मार्चला न्यूझीलंडसोबत होणार आहे.