Industries based on mineral and forest resources in Vidarbha should be established – Nitin Gadkari
विदर्भात असलेल्या खनिज आणि जंगल संपत्तीवर आधारित उद्योग स्थापन व्हावेत – नितीन गडकरी
नागपुर : विदर्भात खनिज आणि जंगल संपत्ती विपुल प्रमाणात असून यावर आधारित पोलाद, मंगेनीजचे कारखाने तसंच उद्योग स्थापन झाले पाहिजेत, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.
सूक्ष्म लघू आणि मध्यम उद्योग विकास संस्था नागपूर आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारातून 12 ते 14 मार्च पर्यंत खासदार औद्योगिक महोत्सवाचं आयोजन हिंगणा एमआयडीसी इथल्या महाराष्ट् इउस्ट्रीज असोसिएशनच्या सभागृहात केलं जात आहे.
त्याबाबत आज नागपुरात प्रसारमाध्यमांना माहिती देतांना गडकरी बोलत होते. विदर्भातल्या कच्चा मालावर मूल्यवर्धन करून विदर्भातली उद्यमशीलता आणि रोजगारनिर्मितीच्या क्षमतावृद्धीमध्ये समन्वय साधणं आवश्यक आहे, असं ते म्हणाले.
या 3 दिवसीय महोत्सवात विविध उद्योग, सार्वजनिक क्षेत्र उपकम यांचे दालन, उद्योग संधी विषयावर आधारित परिसंवाद असणार आहेत.