‘संगम’ या नवनिर्मित आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणार्थी वसतिगृहाचे 1 मार्च 2024 रोजी उदघाटन

वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्था Vaikuntha Mehta National Institute of Cooperative Management, Pune हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Inauguration of newly constructed international trainee hostel ‘Sangam’ on 1st March 2024

वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेमध्ये ‘संगम’ या  आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणार्थी वसतिगृहाचे 1 मार्च 2024 रोजी सहकार राज्यमंत्री बी. एल. वर्मा यांच्या हस्ते उदघाटन होणार

पुणे : वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्था (वैमनीकॉम), पुणे ही सहकार क्षेत्रात शिक्षण, प्रशिक्षण, संशोधन आणि सल्ला सेवा अविरतपणे प्रदान करणारी अग्रणी संस्था आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सहकारातून समृद्धी’ या संकल्पनेच्या पूर्ततेसाठी ही संस्था महत्त्वपूर्ण योगदान देत आहे.वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्था Vaikuntha Mehta National Institute of Cooperative Management, Pune हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

वैमनीकॉममध्ये ‘संगम’ या नवनिर्मित आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणार्थी वसतिगृहाचे 1 मार्च 2024 रोजी सहकार राज्यमंत्री बी. एल. वर्मा यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे. या वसतिगृहाची निर्मिती मार्च 2023 मध्ये भारत सरकारच्या सहकार मंत्रालयाच्या विशेष निधी अनुदानाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

कृषी बँकिंग क्षेत्रात आंतरराष्ट्रीय सहकार आणि प्रशिक्षण केंद्राच्या (सीक्‍टैब) माध्यमातून वैमनीकॉम सार्क देशांसाठी सहकार, कृषी आणि बँकिंग क्षेत्रासाठी सहयोगात्मक आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण कार्यक्रमदेखील आयोजित करते. सीक्‍टैबद्वारे आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सार्क आणि इतर देशांमधले सहभागी नेहमीच येत असतात. अशा विशिष्ट आणि आंतरराष्ट्रीय सहभागींची निवासी आवश्यकता पूर्ण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणार्थी वसतिगृह बांधण्यात आले आहे.

हे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणार्थी वसतिगृह भारताच्या सहकार क्षेत्राची वैशिष्ट्ये आणि यशोगाथा आंतरराष्ट्रीय स्तरावर ठळकपणे अधोरेखित करण्यात एक मंच म्हणून कार्य करेल. हे वसतिगृह भविष्यात भारताला एक प्रमुख सहकारी शिक्षण-प्रशिक्षण केंद्र म्हणून प्रस्थापित करेल.

वैमनीकॉममध्ये आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणार्थी वसतिगृह अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण असून त्यात 50 कक्ष, 3 व्हीआयपी सुटस उपलब्‍ध आहेत. याशिवाय आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणार्थी वसतिगृहात भोजनालय, ग्रंथालय, प्रशिक्षण कक्ष आणि परिषद दालन सुविधा उपलब्ध असून यामुळे प्रशिक्षणार्थीना उत्तम सुविधा प्रदान केल्या जातील.

उदघाटन समारंभाला नवी दिल्लीस्थित आफ्रिकी-आशियाई ग्रामीण विकास संघटनेचे सचिव डॉ. मनोज नरदेवसींग विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच सहकारी समितीचे व्यवस्थापक, साखर सहकारी समितीचे आयुक्त आणि इतर संस्थांचे अधिकारी व मान्यवर व्यक्ती कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘पुणे पुस्तक परिक्रमा’ चे उद्धाटन

Spread the love

One Comment on “‘संगम’ या नवनिर्मित आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणार्थी वसतिगृहाचे 1 मार्च 2024 रोजी उदघाटन”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *