ISRO’s GSLV-F14 satellite launched from Sriharikota tomorrow
इस्रोच्या जीएसएलव्ही-एफ१४ या उपग्रहाचं उद्या श्रीहरीकोटा इथून प्रक्षेपण
उपग्रह हवामानाचा अचूक अंदाज वर्तवण्याच्या दृष्टीनं उपयुक्त
श्रीहरीकोटा: इनसॅट-३डीएस वाहून नेणाऱ्या जीएसएलव्ही-एफ१४ या उपग्रहाचं उद्या संध्याकाळी श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रामधून प्रक्षेपण होणार आहे. जीएसएलव्ही-एफ१४ हे इनसॅट-३डीएसचे प्रक्षेपण संध्याकाळी ५.३० वाजता होणार आहे.
GSLV-F14 हे जिओसिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल, GSLV चे 16 वे उड्डाण आहे आणि स्वदेशी क्रायो स्टेजसह 10 वे उड्डाण आहे. स्वदेशी क्रायोजेनिक स्टेजसह GSLV चं हे सातवं प्रक्षेपण असेल आणि ते इनसॅट-३डीएस या उपग्रहाला पृथ्वीच्या कक्षेत स्थिर करेल.
हा उपग्रह हवामानाचा अचूक अंदाज वर्तवण्याच्या दृष्टीनं विकसित करण्यात आला आहे. हवामानाचा अंदाज घेण्यासाठी आणि आपत्तीची आगाऊ सूचना देण्यासाठी हा उपग्रह भूभाग आणि महासागरांच्या पृष्ठभागाचं निरीक्षण करेल.
इनसॅट-3डीएस उपग्रह सध्या कार्यरत असलेल्या इनसॅट-3डी आणि इनसॅट-3डीआर इन-ऑर्बिट उपग्रहांसह हवामानविषयक सेवा वाढवणार आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
हे ही अवश्य वाचा
निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी आवश्यक सुरक्षा उपाययोजना करा
One Comment on “इस्रोच्या जीएसएलव्ही-एफ१४ या उपग्रहाचं उद्या प्रक्षेपण”