सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जैन अध्यासनाला एक लाखाची देणगी

Savitribai Phule Pune University, Hadapsar News, Hadapsar Latest News,हडपसर मराठी बातम्या

Donation of one lakh to Jain Adhyasana of Savitribai Phule Pune University

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जैन अध्यासनाला एक लाखाची देणगीSavitribai Phule Pune University

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेठ हिराचंद नेमचंद जैन अध्यासनाला एक लाखाची देणगी मिळाली आहे. चांदणी चौक स्थित महावीर दिगंबर जैन मंदिरातर्फे ही देणगी देण्यात आली. या देणगीचा चेक मंदिराचे ट्रस्टी उदय लेंगडे यांनी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांना शुक्रवारी सुपूर्त केला. यावेळी अध्यासनाचे प्रमुख डॉ. कमल कुमार जैन यांच्यासह जैन मंदिरातील रमेश शहा, मोहन कुडचे, शोभा पोकळे, जाई दोशी, सारिका ओस्तवाल आदी उपस्थित होते. या देणगीसाठी डॉ. गोसावी यांनी महावीर दिगंबर जैन मंदिराचे, ट्रस्टीजचे आभार मानले. तसेच अध्यासनासाठी मोठ्या प्रमाणात देणगी देण्याचे आवाहनही केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सेठ हिराचंद नेमचंद जैन अध्यासन जैन दर्शन हे भारताच्या, जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचविण्याचे काम करत आहे. यासाठी ते वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करत असतात. नविन वर्षात अध्यासनातर्फे जैन तत्त्वज्ञान डिप्लोमा कोर्स सुरू करण्यात येत आहे. तसेच जानेवारी २०२४ मध्ये जैन हस्तलिखित कार्यशाळेचेही आयोजन करण्यात येणार आहे. शिवाय लवकरच श्रीमद् राजचंद्र विरचित अध्यात्म सिद्धिशास्त्र या विषयावर द्विदिवसीय कार्यशाळाही अध्यासनातर्फे घेण्यात येणार आहे.

सावित्रीबाई फुले विद्यापीठातील सर्वच अध्यासनांच्या प्रमुखांनी अध्यासनाचे कार्य अधिक जोमात करण्यासाठी अशाच पद्धतीने देणगीदारांशी संपर्क साधून निधीचे संकलन करावे – डॉ. विजय खरे, प्रभारी कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

अध्यासनाचे कार्य गतिमान, गतिशील करण्यासाठी अशाप्रकारची मदत बळ देते. तसेच अध्यासनाचे कार्य समाजापर्यंत पोहचणे गरजेचे असून यामुळे त्यासाठी मदत होते – डॉ. सुरेश गोसावी, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
लघुउद्योजकांना जिल्हास्तरीय पुरस्काराकरीता २० डिसेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
Spread the love

One Comment on “सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जैन अध्यासनाला एक लाखाची देणगी”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *