Jodemaro agitation on behalf of Pune City Women’s Congress against Assam Chief Minister Hemant Biswa
आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिसवा यांच्या विरोधात पुणे शहर महिला काँग्रेसच्या वतिने जोडेमारो आंदोलन.
पुणे: आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिसवा यांनी काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांच्या बद्दल अक्षेपार्ह विधान केल्याच्या निषेधार्थ, तेच स्व. पंतप्रधान राजीव गांधी आणि सोनीया गांधी यांच्या विरोधात वैयक्तीक टिप्पणी केल्याच्या निषेधार्थ पुणे शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा पुजा आनंद यांच्या नेत्-त्वाखाली खडकीच्या एमएसईबी चौकात मुख्यमंत्री हेमंत बिसवा यांच्या विरोधात जोडेमारो आंदोलन करण्यात आले.
यावेळी पुणे शहर महिला काँग्रेसच्या वतिने आयोजित आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिसवा यांच्या विरोधातील जोडेमारो आंदोलनात निषेधार्थ पुणे शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा पुजा आनंद, यावेळी पुणे शहराध्यक्ष रमेश बागवे, रफीक शेख, सुजाता शेट्टी, स्वाती शिंदे, संगीता तिवारी, शैलाजा खेडेकर, नानी राजगुरू, लता अडसुल त्याच प्रमाणे महिला पदाधिकारी सहभागी झाल्या होत्या.
शहराध्यक्ष बागवे यांनी भाजपच्या संस्क्-तीवर अक्षेप घेतला. पुजा आनंद यांनी राजकारणाची पातळी घसरच जालली असुन भाजपकडे मुद्दे नसल्याने ते वैयक्तीक हल्ले करत असल्याचा आरोप केला. संगीता तिवारी यांनी भाजप हा महिलांचा व्देश करणारा पक्ष आहे. त्यांनी सतत महिलांचा अपमान केला असल्याचा आरोप केला.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ, किरीट सोमय्या यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. तसेच मुख्यमंत्री हेमंत बिसवा यांचा निषेध करत त्यांच्या पुतळ्याला जोड्याने मारण्यात आले.