Eligible Ex-Servicemen are invited to apply for the posts of Junior Engineer (Civil) in Pune Municipal Corporation
पुणे महानगरपालिकेतील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदांसाठी पात्र माजी सैनिकांनी अर्ज करण्याचे आवाहन
पुणे : पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) वर्ग-३ या पदाच्या भरतीमध्ये माजी सैनिकांसाठी २६ जागा राखीव असून पात्र माजी सैनिकांनी या रिक्त पदांसाठी अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने केले आहे.
महानगरपालिकेकडील रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात ९ जानेवारी रोजी प्रसिद्ध झाली आहे. या जाहिरातीत मागील अनुशेषाच्या १३ आणि सध्याच्या जाहिरातीतील १३ जागा अशा २६ जागांचा समावेश आहे. https://www.pmc.gov.in/ या संकेतस्थळावर रिक्रुटमेंट या टॅब मध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक अर्हता व इतर बाबींची पूर्तता करणाऱ्या पात्र माजी सैनिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल हंगे स. दै. (नि.) यांनी केले आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदांसाठी पात्र माजी सैनिकांनी अर्ज करण्याचे आवाहन”