Karmaveer Bhaurao Patil Maharishi of Modern Education
कर्मवीर भाऊराव पाटील आधुनिक शिक्षणमहर्षी : आमदार चेतन तुपे पाटील
हडपसर :100 वर्षांपूर्वी ग्रामीण भागातील शिक्षणाची गरज ओळखणारे ,ग्रामीण शिक्षण चळवळीचे जनक म्हणजेच कर्मवीर भाऊराव पाटील. संपूर्ण महाराष्ट्रभर अनवाणी फिरून कर्मवीर भाऊरावांनी उभा महाराष्ट्र पिंजून काढला.
गोरगरिबांच्या झोपडी पर्यंत शिक्षणाची गंगोत्री पोहोचवण्याचे कार्य केले. लोकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊन आपल्या कार्यात सहभागी करून घेतले. लोकशाहीचा मूळ गाभा लोकशिक्षण आहे आणि लोकशिक्षण समाजाला विकासाकडे नेते , हे कर्मवीरांना ठाऊक होते.
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची 1919 मध्ये स्थापना करून शिक्षण प्रसाराचे कार्य केले. असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे पश्चिम विभागीय चेअरमन आमदार चेतन तुपे पाटील यांनी केले.
22 सप्टेंबर 2023 रोजी कर्मवीर भाऊराव पाटील यांची 136 वी जयंती रयत शिक्षण संस्था पश्चिम विभाग पुणे व कर्मवीर भाऊराव पाटील श्रमिक पथारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने स्वारगेट,पुणे येथीलव्होल्गा चौकात समारंभपूर्वक साजरी करण्यात आली. यावेळी चेतन तुपे पाटील बोलत होते.
या कार्यक्रमासाठी रयत शिक्षण संस्थेचे विभागीय अधिकारी किसन रत्नपारखी,सहविभागीय अधिकारी शंकर पवार,पथारी संघटना अध्यक्ष मनोहर परदेशी,विजेद्र परदेशी,स्कूल कमिटी सदस्य वडगाव खुर्द काकासाहेब चव्हाण,दादासाहेब पोकळे,जनरल बाॅडी सदस्य रामदास जगदाळे,संजयराव मते,दयानंद इरकल,प्राचार्य डाॅ.नानासाहेब गायकवाड ,प्राचार्य दत्तात्रय जाधव, आजीव सभासद लालासाहेब खलाटे, डाॅ.दत्तात्रय हिंगणे,पुणे परिसरातील सर्व शाखा व महाविद्यालयाचे प्राचार्य,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,सेवानिवृत्त रयतसेवक व रयतप्रेमी उपस्थित होते.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
हे ही अवश्य वाचा
बार्टी आणि एनआयईएल यांच्यात सामंजस्य करार
One Comment on “कर्मवीर भाऊराव पाटील आधुनिक शिक्षणमहर्षी”