अंमली पदार्थांची तस्करी करत असलेली केनियाची महिला ताब्यात

Directorate of Revenue Intelligence महसूल गुप्तचर संचालनालय हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Kenyan woman arrested for drug trafficking

अंमली पदार्थांची तस्करी करत असलेल्या केनियाच्या महिलेला, महसूल गुप्तमाहिती संचालनालयाने (डीआरआय) घेतले ताब्यात

1490 ग्रॅम वजनाची आणि काळ्या बाजारात 14.90 कोटी रुपये मूल्य असलेली बहुतेक कोकेनची पांढरी पावडर जप्तDirectorate of Revenue Intelligence महसूल गुप्तचर संचालनालय हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

मुंबई : डीआरआयला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर, केक्यू 204 या नैरोबीहून मुंबईला आलेल्या विमानातील, केनियाचे नागरिकत्व असलेल्या एका महिलेला, ‘डीआरआय’ च्या अधिकाऱ्यांनी आज (28.12.23) मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ताब्यात घेतले.

तिच्या सामानाची तपासणी केली असता, 1490 ग्रॅम वजनाची आणि काळ्या बाजारात 14.90 कोटी रुपये मूल्य असलेली बहुतेक कोकेनची पांढरी पावडर मिळाली आणि ती जप्त करण्यात आली.

केसांना लावण्‍यात येणा-या कंडिशनरच्या बाटलीमध्ये आणि अंगाच्या साबणाच्या बाटलीमध्ये घालून, दोन काळ्या रंगाच्या पॉलिथिनच्या पिशव्यांमध्ये, ही अंमली पदार्थांची पांढरी पावडर मोठ्या खुबीने लपवून ठेवली होती.

एनडीपीएस कायदा 1985 च्या तरतुदीनुसार या महिलेला अटक करण्यात आली असून तिची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

या अमली पदार्थ पुरवठा साखळीतील अन्य दुवे शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
न्हावा शेवा इथे तस्करीच्या 5.7 कोटी रुपयांच्या सिगारेट कांड्या घेतल्या ताब्यात
Spread the love

One Comment on “अंमली पदार्थांची तस्करी करत असलेली केनियाची महिला ताब्यात”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *