Launch of UPI service of Sadhana Bank.
What is happening in the world in the field of banking, Sadhana Bank is making available to the customers in the form of facilities. The bank has adopted a policy of modernization and has introduced such services from time to time. As an important part of this, the bank has launched the UPI service. “The work of the bank is commendable,” said Chetan Tupe, MLA and member of the steering committee of Sadhana Bank. The UPI service was launched at the main branch of Sadhana Sahakari Bank at Hadapsar by MLA Chetan Tupe. He was talking at the time. Due to the oppressive conditions of the Reserve Bank, Sadhana Bank is being delayed from becoming a Schedule Bank. The bank is trying to do this. The threat of cybercrimes to the banking sector will increase day by day, for which banks need to use up-to-date technology, said MLA Tupe while giving further guidance, adding that Sadhana Bank is now in your hands. The UPI service is going to be a big help for cashless transactions. Work on the bank’s head office is nearing completion and the bank’s head office will soon be relocated to a new location. Therefore, he expressed confidence that the progress of the bank will increase in the future.
Steering Committee Member Dilip Aba Tupe, Sadhana Bank Chairman Anil Tupe, Vice Chairman Abasaheb Kapre, and all the Board of Directors of the Bank were present on the occasion. Chairman Anil Tupe said the UPI service would be an important part of the bank. Member Dilip Aba Tupe said that members, office bearers, employees, and customers have placed the bank at the top position. For UPI service, the account holder has to download the bank’s mobile app from his mobile, register a single mobile number with an ATM card and then download one of the Google Pay, Phone Pay or Paytm apps and enter the Sadhana Bank account number and password to make further online transactions. This was stated by Anil Mahajan, Officer, Computer Department, while Charudatta Sohoni, Chief Executive Officer, Bank, thanked the audience.
साधना बँकेच्या यूपीआय सेवेचा शुभारंभ.
बँकिंग क्षेत्रात जगात जे चालू आहे, ते ग्राहकांना सुविधांच्या स्वरूपात साधना बँक उपलब्ध करून देत आहे. बँकेने आधुनिकीकरण करण्याचे धोरण स्वीकारले असून, अशा सेवाही वेळोवेळी सुरू केल्या आहेत. याचा महत्वाचा भाग म्हणून बँकेने यूपीआय सेवा सुरु केली आहे. ‘बँकेचे काम कौतुकास्पद आहे’, असे गौरवोद्गार आमदार व साधना बँकेचे सुकाणू समितीचे सदस्य चेतन तुपे यांनी काढले. हडपसर येथील साधना सहकारी बँकेच्या मुख्य शाखेत, यूपीआय सेवेचा शुभारंभ आमदार चेतन तुपे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. रिझर्व बँकेच्या जाचक अटीमुळे, साधना बँकेला शेड्युल बँक होण्यास विलंब होत आहे. यासाठी बँक प्रयत्न करीत आहे. बँकिंग क्षेत्राला सायबर क्राईम्स धोका दिवसेंदिवस वाढत जाईल, त्यासाठी बँकांनी अद्ययावत तंत्रज्ञान वापरणे आवश्यक आहे, असे सांगून अधिक मार्गदर्शन करताना आमदार तुपे म्हणाले, साधना बँक आता तुमच्या मुठीत आली आहे. यूपीआय सेवेमुळे कॅशलेस व्यवहार होण्यासाठी मोठी मदत होणार आहे. बँकेचे मुख्य कार्यालयाचे काम पूर्णत्वास जात असून लवकरच नवीन जागेत बँकेचे मुख्य कार्यालय स्थलांतरित होईल. त्यामुळे पुढील काळात बँकेची प्रगती आणि आणखी वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या शुभारंभ कार्यक्रमास सुकाणू समितीचे सदस्य दिलीप आबा तुपे, साधना बँकेचे चेअरमन अनिल तुपे , व्हाईस चेअरमन आबासाहेब कापरे, तसेच बँकेचे सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. चेअरमन अनिल तुपे म्हणाली की बँकेसाठी यूपीआय सेवा ही महत्त्वाचा भाग ठरेल. सभासद, पदाधिकारी, कर्मचारी ग्राहकांनी बँकेला सर्वोच्च स्थानी ठेवल्याचे सदस्य दिलीप आबा तुपे यांनी सांगितले . यूपीआय सेवे साठी खातेदाराने आपल्या मोबाईल वरुन बँकेचे मोबाईल ॲप डाऊनलोड करावे, एटीएम कार्ड घेऊन एकच मोबाईल नंबर रजिस्टर करावा व त्यानंतर गुगल पे, फोन पे, किंवा पेटीएम त्यापैकी एक ॲप डाऊनलोड करून त्यावर साधना बँकेचे खाते नंबर आणि पासवर्ड देऊन पुढील ऑनलाईन व्यवहार करता येतील, असे संगणक विभागाचे अधिकारी अनिल महाजन यांनी सांगितले तर बँकेच्या मुख्य कार्यकारी चारुदत्त सोहोनी यांनी उपस्थितांचे आभार मानले.