देशातल्या सर्व ब्रॉडगेज लाईनचं २०२३ पर्यंत विद्युतीकरण केली जाण्याची केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांची माहिती

Union Minister of State for Railways informed that all broad gauge lines in the country will be electrified by 2023

देशातल्या सर्व ब्रॉडगेज लाईनचं २०२३ पर्यंत विद्युतीकरण केली जाण्याची केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांची माहिती

जालना :  देशातल्या सर्व ब्रॉडगेज लाईनचं २०२३ पर्यंत विद्युतीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला असून, त्यासाठी अर्थसंकल्पात ७ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, असं केंद्रीय रेल्वेराज्यमंत्रीUnion Railway State Minister for Railways  Rao Saheb Danwe रावसाहेब दानवे यांनी सांगितलं. मनमाड ते मुदखेड या रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणाच्या कामाचा आरंभ आज जालना इथं केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते आणि केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड, यांच्या उपस्थितीत झाला,  त्यावेळी ते बोलत होते.
रावसाहेब पाटील दानवे म्हणाले, भारतीय रेल्वे आपल्या सध्याच्या ब्रॉड गेज मार्गांसोबतच सर्व रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण मिशन मोडवर करत आहे. ते म्हणाले की, दमरेचा मनमाड – मुदखेड विभाग मराठवाडा क्षेत्राच्या दृष्टीने एक महत्वाची रेल्वे लिंक आहे.
रेल्वे मार्गांच्या विद्युतीकरणामुळे कार्बन उत्सर्जन कमी होईल आणि इंधन खर्च देखील कमी होईल, यामुळे पर्यावरणाचे रक्षण देखील होईल. दानवे म्हणाले की मुंबई-नागपुर; मुंबई-पुणे-हैदराबाद विभागात हाय स्पीड ट्रेन सुरु करण्यासाठी डीपीआर (विस्तृत प्रकल्प अहवाल) बनविण्याचे काम वेगाने सुरु आहे.

येणाऱ्या काळात सर्वसुविधायुक्त ४०० वंदे भारत रेल्वे सुरू करण्यात येणार असून, याचा लाभ  मराठवाड्याला मिळावा यासाठी ४८४ कोटी खर्चाच्या मनमाड-मुदखेड या ३५७ किलोमीटर रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणाचं काम प्राधान्यानं हाती घेतलं आहे, तसंच  मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनचा प्रकल्प आराखडा महिनाभरात तयार होणार असून, यावर्षीच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातल्या रेल्वेमार्गांसाठी ११ हजार कोटींचा निधी  दिला असल्याचं दानवे यांनी  सांगितलं.

प्रधानमंत्री गतीशक्ती योजनेअंतर्गत राज्यात रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग, बंदरं, विमानतळ, जलवाहतूक यांचा  प्रधान्यानं विकास करण्यात येत असल्याचं यावेळी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी सांगितलं.
Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *