Government take steps to facilitate wider proliferation and innovation in Machine to Machine communication (M2M) sector
मशीन ते मशीन संपर्क यंत्रणा क्षेत्राची विस्तृत प्रमाणात वाढ करून त्यात अभिनव संशोधने करण्याची सुविधा पुराविण्यासाठी सरकार पावले उचलीत आहे
मशीन ते मशीन सेवा पुरवठादार आणि डब्ल्यूपीएएन/डब्ल्यूएलएएन संपर्क पुरवठादारांच्या नोंदणीसाठी जारी केल्या मार्गदर्शक सूचना
नवी दिल्ली : मशीन ते मशीन किंवा इंटरनेट ऑफ थिंग्स ही अत्यंत वेगाने उदयाला येणारी तंत्रज्ञाने असल्याचे केंद्र सरकारने जाणले असून त्यांचा उपयोग जोडणीयोग्य साधनांच्या माध्यमातून उर्जा, स्वयंचलित यंत्रे, संरक्षण आणि पाळत, दूरस्थ आरोग्य व्यवस्थापन, कृषी इत्यादी क्षेत्रांमध्ये आधुनिक सुविधा पुरविण्यासाठी केला जात आहे.
डिजिटल भारत आणि मेक इन इंडिया या केंद्र सरकारच्या उपक्रमांमध्ये मशीन ते मशीन संपर्क यंत्रणा मुख्य भूमिका निभावत असून लक्षणीय योगदान देत आहे.
मशीन ते मशीन परिसंस्था अधिक मजबूत करण्यासाठी तसेच या क्षेत्राची विस्तृत प्रमाणात वाढ करून त्यात अभिनव संशोधन करण्यासाठी नुकतीच खालील कार्ये हाती घेण्यात आली आहेत:
- मशीन ते मशीन सेवा पुरवठादार आणि डब्ल्यूपीएएन/डब्ल्यूएलएएन संपर्क पुरवठादारांच्या नोंदणीसाठी 8 फेब्रुवारी 2022 रोजी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.अर्जदारांनी सीम आणि डब्ल्यूपीएएन/डब्ल्यूएलएएन आधारित मशीन ते मशीन संपर्कसेवा पुरवठा करण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे टीपीएस शी संपर्क, केआयसी, शोधण्याची क्षमता आणि गोपनीयता यांच्या संदर्भातील समस्या सोडविण्यात मदत होईल. केंद्रीय दूरसंचार विभागाच्या देशभरातील क्षेत्र कार्यालयांमध्ये नोंदणी करता येऊ शकेल.
- यूएल आणि यूएल-व्हिएनओ परवान्यांअंतर्गत यूएल (मशीन ते मशीन) आणि यूएल-व्हिएनओ (मशीन ते मशीन) साठीचे नवे परवाने सुरु करण्यात आले आहेत आणि त्या नुसार 17 जानेवारी 22 रोजी त्या संदर्भातील मार्गदर्शक सूचनांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे.सध्याच्या पुरवठादारांना मशीन ते मशीन किंवा इंटरनेट ऑफ थिंग्स नेटवर्क द्वारे सेवा पुरविण्याची क्षमता या आधीच प्रदान करण्यात आली आहे आणि नव्या परवान्यांच्या माध्यमातून मशीन ते मशीन किंवा इंटरनेट ऑफ थिंग्सच्या अंतर्गत जोडणीसाठी नेटवर्क निर्माण करणे, कार्यान्वित करणे आणि पुरवठा करणे सुनिश्चित करण्यात आले आहे.
- मशीन ते मशीन किंवा इंटरनेट ऑफ थिंग्सच्या परीचालनासाठी अतिरिक्त स्पेक्ट्रम उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आधीच्या 865-867 मेगाहर्ट्झ बँड मध्ये 1 मेगाहर्ट्झ अतिरिक्त स्पेक्ट्रम उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच विविध वापरासाठीची रॅडीएटेड उर्जा, चॅनेल बँडविड्थ आणि ड्युटी सायकल निश्चित करण्यात आली आहेत.
त्याखेरीज, मशीन ते मशीन किंवा इंटरनेट ऑफ थिंग्सच्या क्षेत्रात वाढ करण्यासाठी दूरसंचार विभागाने विविध पावले उचलली आहेत.