मधुमक्षिका पालकांसाठी सुवर्णसंधी: मधुक्रांती पोर्टलवर नोंदणी करा

जैवविविधतेचेही रक्षण आणि परिसंस्थेसाठी मधमाशी महत्वाची Bees are also important for the conservation of biodiversity and ecosystems हडपसर मराठी बातम्या Hadapsar News

Golden opportunity for beekeepers: Register on Madhukranti portal

मधुमक्षिका पालकांसाठी सुवर्णसंधी: मधुक्रांती पोर्टलवर नोंदणी करा

मधुमक्षिका पालनासाठी सरकारचा महत्वाकांक्षी उपक्रमजैवविविधतेचेही रक्षण आणि परिसंस्थेसाठी मधमाशी महत्वाची Bees are also important for the conservation of biodiversity and ecosystems हडपसर मराठी बातम्या Hadapsar News

मुंबई : मधुमक्षिका पालकांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळाचे संचालक किसन मुळे यांनी मधुमक्षिका पालकांना **मधुक्रांती पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन** केले आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने राष्ट्रीय मधुमक्षिका मंडळ, नवी दिल्ली अंतर्गत https://madhukranti.in/nbb हे पोर्टल विकसित केले आहे. यामुळे मध व मधमाशी उत्पादनांचा योग्य स्त्रोत ओळखणे आणि अद्ययावत नोंदी ठेवणे शक्य होणार आहे.

मधुमक्षिका पालकांना होणारे महत्त्वाचे लाभ

1. मान्यता प्राप्त ओळख: नोंदणी झाल्यानंतर मधुमक्षिका पालकांना अधिकृत प्रमाणपत्र मिळेल.
2. विमा सुरक्षा: नोंदणी धारकांना ₹1 लाखांपर्यंत मोफत विमा मिळणार आहे.
3. विनाअडथळा स्थलांतर:मधमक्षिका पेट्यांचे सहज स्थलांतर करता येईल.

नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे

1. आधार कार्ड व अद्ययावत मोबाईल क्रमांक (आधारशी लिंक केलेला).
2. मधुमक्षिका पालनासंबंधित तपशील व प्रशिक्षण प्रमाणपत्र (200 KB पर्यंत).
3. मधुमक्षिका पालकाचा मधुमक्षिका पेट्यांसह फोटो (100 KB पर्यंत).

नोंदणी शुल्क

स्वमालकीच्या फ्रेम्सच्या संख्येनुसार नोंदणी शुल्क खालीलप्रमाणे असेल:
– 10-100 फ्रेम: ₹250
– 101-250 फ्रेम: ₹500
– 251-500 फ्रेम: ₹1,000
– 501-1,000 फ्रेम: ₹2,000
– 1,001-2,000 फ्रेम: ₹10,000
– 2,001-5,000 फ्रेम: ₹25,000
– 5,001-10,000 फ्रेम: ₹1,00,000
– 10,000 पेक्षा अधिक फ्रेम: ₹2,00,000

नोंदणीसाठी संपर्क व मदत

1. राष्ट्रीय मधुमक्षिका मंडळ, नवी दिल्ली: 011-23325265, 23719025
2. मधुक्रांती पोर्टल तांत्रिक मदत: 18001025026
3. महाराष्ट्र राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळ, पुणे: (020) 29703228

संपूर्ण ऑनलाईन प्रक्रिया

मधुमक्षिका पालकांसाठी ही नोंदणी पूर्णपणे ऑनलाईन आहे. जास्तीत जास्त पालकांनी याचा लाभ घेऊन नोंदणी करावी, असे आवाहन मंडळाने केले आहे.

मधुमक्षिका पालन क्षेत्रासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा

संसदेचं हिवाळी अधिवेशन संस्थगित

Spread the love

One Comment on “मधुमक्षिका पालकांसाठी सुवर्णसंधी: मधुक्रांती पोर्टलवर नोंदणी करा”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *