Maharashtra crosses the 3 crore vaccine stage in corona vaccination.
Maharashtra has become the first state to administer more than 3 crore doses of the corona vaccination campaign. About 4 lakh 80 thousand citizens were vaccinated till 7 pm today. Maharashtra has once again taken the lead in the country by crossing the 3 crore dose stage at around 2 pm today.
Maharashtra has been at the forefront of vaccination from the very beginning. Due to today’s vaccination, 3 crore 2 lakh 71 thousand 606 vaccines have been given till 7 pm. Today 4 lakh 80 thousand 954 citizens were vaccinated in a single day. The figures are as high as 7 pm and are likely to increase, said Additional Chief Secretary of the Health Department. Pradip Vyas said.
कोरोना प्रतिबांधात्मक लसीकरणात महाराष्ट्राने ओलांडला ३ कोटी लस मात्रांचा टप्पा.
कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत ३ कोटींहून अधिक डोस देणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरले आहे. आज सायंकाळी सातपर्यंत सुमारे ४ लाख ८० हजार नागरिकांना लस देण्यात आली. आज दुपारी दोनच्या सुमारास ३ कोटी डोसेसचा टप्पा ओलांडून महाराष्ट्र पुन्हा एकदा देशात अग्रेसर राहिले आहे.
लसीकरणात महाराष्ट्र पहिल्यापासून अग्रस्थानी आहे. आज झालेल्या लसीकरणामुळे सायंकाळी सात पर्यंत ३ कोटी २ लाख ७१ हजार ६०६ लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. आज एकाच दिवसात ४ लाख ८० हजार ९५४ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. सायंकाळी सातपर्यंतची ही आकडेवारी असून त्यात वाढ होण्याची शक्यता असल्याचे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.