Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari today thanked Prime Minister Narendra Modi for making a glorious mention of Maharashtra’s ace archer Pravin Jadhav in his Mann Ki Baat.
It is a matter of pride for the state that Prime Minister Narendra Modi has proudly mentioned Praveen Jadhav, an archer from Satara district, in today’s ‘Mann Ki Baat’.
The Hon’ble Prime Minister had said:
“Friends, when Talent, Dedication, Determination and Sportsman Spirit come together only then a champion is made. In our country, most of the sportspersons hail from the smaller towns and villages. Our team that is going to Tokyo too has many such players whose life inspires a lot. When you hear about our Praveen Jadhav Ji, then you too will feel… how many difficulties Praveen has gone through to reach here. Praveen hails from a village in the Satara district of Maharashtra. He is very good at Archery. His parents run the family by working as labourers and now their son is going to participate in his first Olympics in Tokyo. This is a matter of great pride not only for his parents but for all of us.”
I would like to express my gratitude to the Prime Minister for this glorious mention and on behalf of the entire state, I wish Praveen Jadhav a glorious success in the Olympics, said Governor Bhagat Singh Koshyari.
साताऱ्याच्या प्रवीण जाधवला शुभेच्छा दिल्याबद्दल, राज्यपालांकडून पंतप्रधानांचे आभार.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या ‘मन की बात’ मध्ये सातारा जिल्ह्यातील प्रवीण जाधव या धनुर्विद्या क्रीडापटूचा गौरवपूर्ण उल्लेख केला, ही राज्याकरिता अभिमानाची बाब आहे. मा.पंतप्रधान महोदयांचे या गौरवपूर्ण उल्लेखाबाबत मी आभार व्यक्त करतो तसेच संपूर्ण राज्याच्या वतीने प्रवीण जाधवला ऑलिम्पिकमध्ये देदिप्यमान यशासाठी शुभेच्छा देतो, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटले आहे.
आज प्रसारित झालेल्या ‘मन की बात’ मध्ये पंतप्रधान मोदी यांनी म्हटले की :
“मित्रांनो, जेव्हा बुद्धिमत्ता, समर्पण, निश्चय आणि खिलाडू वृत्ती एकत्र येतात, त्यावेळी चॅम्पियन घडत असतात. आपल्या देशातील बहुतांश क्रीडापटू लहान गाव किंवा छोट्या शहरांमधून येतात. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यासाठी जाणाऱ्या आपल्या पथकामध्ये देखील अश्या अनेक प्रेरणादायी खेळाडूंचा समावेश आहे. प्रवीण जाधव यांच्याबद्दल ऐकल्यावर तुम्हालादेखील तसेच वाटेल. ऑलिम्पिकपर्यंत पोहोचण्यासाठी प्रवीणने किती तरी अडी-अडचणींचा सामना केला आहे. प्रवीण महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील आहे. तो धनुर्विद्येत फार चांगली कामगिरी करतोय. त्याचे आई वडील उपजीविकेसाठी रोजंदारीवर काम करीत आहेत, आणि त्यांचा मुलगा आपल्या पहिल्या वाहिल्या ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यासाठी टोकियो येथे जात आहे. ही केवळ त्याच्या पालकांकरिताच नव्हे, तर आपण सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे”.
मा.पंतप्रधान महोदयांचे या गौरवपूर्ण उल्लेखाबाबत मी आभार व्यक्त करतो तसेच संपूर्ण राज्याच्या वतीने प्रवीण जाधवला ऑलिम्पिकमध्ये देदिप्यमान यशासाठी शुभेच्छा देतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.