Organizing ‘Maharashtra Startup Week’ will give impetus to new ideas of the youth.
Appeal to apply for participation by June 15.
The Maharashtra State Innovation Society of the state government will soon organize a ‘Maharashtra Startup Week’ to promote the ideas of young and innovative entrepreneurs. Skills Development, Employment and Entrepreneurship Minister Nawab Malik has appealed to startups to visit www.msins.in/startup-week to apply for participation. The deadline to apply for participation is June 15, 2021.
Work order of Rs 15 lakh to the winning startups
Maharashtra Startup Week is a major initiative to give startups a chance to work with the government. The main objective of this week is to bring innovation in the government by implementing innovative products and services of startups in the government system. Under this, the winning startups are given work orders of Rs. 15 lakhs each to implement their products and services with various government departments on an experimental basis. These include agriculture, healthcare, smart infrastructure, sustainability – pollution free energy, sustainability – waste management, sustainability – water management, mobility, administration, education, skills development. Startups can apply to participate,
On behalf of the Maharashtra State Innovation Society, Maharashtra Startup Week has been successfully held three times so far. This year too, this week is being held to promote and enable the startup ecosystem. The previous winning startups have worked with various government agencies, departments such as National Health Mission, Maharashtra Pollution Control Board, MSEDCL, Rural Development Department, various Municipal Corporations, District Offices.
To achieve the objectives of the Maharashtra State Innovative Startup Policy, the Maharashtra State Innovation Society carries out various schemes, initiatives and programs related to the field of startup and innovation for all constituents of the State. These policies include Startup Week, Incubator Establishment, Startup and Innovation Journey, Grand Challenge, Hackathon, Quality Testing and Certification Financing Scheme, Intellectual Property Rights Financing Scheme, District Innovation Sorting Plan, Maharashtra Virtual Incubation Center, and many more Is being implemented successfully. Due to these programs, many entrepreneurs in the state are getting various types of assistance and guidance related to entrepreneurship. Due to such various initiatives and successes, the state has been ranked second in the Innovation Index 2020 released by the Policy Commission, said the Minister. Malik said.
महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहा’ चे आयोजन, तरुणांच्या नव कल्पनांना मिळणार चालना .
सहभागासाठी १५ जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन.
राज्य शासनाच्या महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी तर्फे तरुण आणि नवउद्योजकांच्या कल्पनांना चालना देण्यासाठी लवकरच ‘महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह’ आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये सहभागी होण्याकरिता अर्ज करण्यासाठी इच्छुक स्टार्टअप्सनी www.msins.in/startup-week या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी केले आहे. सहभागासाठी अर्ज करण्याची मुदत 15 जून 2021 पर्यंत आहे.
विजेत्या स्टार्टअप्सना १५ लाख रुपयांचे कार्यादेश.
स्टार्टअप्सना शासनासोबत काम करण्याची संधी देण्यासाठी महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह हा एक प्रमुख उपक्रम आहे. स्टार्टअप्स ची नाविन्यपूर्ण उत्पादने आणि सेवा शासकीय यंत्रणेत राबवून शासनात नाविन्यता आणणे हे या सप्ताहाचे मुख्य उद्दीष्ट आहे. याअंतर्गत विजेत्या स्टार्टअप्सना त्यांच्या उत्पादन तथा सेवेची शासनाच्या विविध विभागांबरोबर प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी करण्यासाठी त्यांना प्रत्येकी १५ लाख रुपयांचे कार्यादेश देण्यात येतात. यामध्ये कृषी, आरोग्य सेवा, स्मार्ट पायाभूत सुविधा, शाश्वतता- प्रदूषणमुक्त उर्जा, शाश्वतता– कचरा व्यवस्थापन, शाश्वतता – जलव्यवस्थापन, गतिशीलता, प्रशासन, शिक्षण, कौशल्य विकास या क्षेत्रांचा समावेश आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी स्टार्टअप्स अर्ज करू शकतात.
महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीतर्फे, महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह आतापर्यंत तीन वेळा यशस्वीपणे संपन्न झाला आहे. यावर्षी देखील, स्टार्टअप इकोसिस्टीमला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सक्षम करण्यासाठी या सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे. यापुर्वीच्या विजेत्या स्टार्टअप्सनी राष्ट्रीय आरोग्य मिशन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महावितरण, ग्रामविकास विभाग, विविध महानगरपालिका, जिल्हा कार्यालये अशा विविध शासकीय संस्था, विभागांसोबत काम पूर्ण केले आहे.
महाराष्ट्र राज्य नाविन्यपूर्ण स्टार्टअप धोरणाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत, राज्यातील सर्व घटकांकरिता स्टार्टअप व नाविन्यता क्षेत्राशी संबधित विविध योजना, उपक्रम व कार्यक्रम राबविले जातात. या धोरणांतर्गत स्टार्टअप वीक, इनक्यूबेटर ची स्थापना,स्टार्टअप आणि नाविन्यपूर्ण यात्रा, ग्रँड चॅलेंज, हॅकेथॉन, गुणवत्ता परीक्षण आणि प्रमाणनअर्थसहाय्य योजना, बौद्धिक संपदा हक्क अर्थसहाय्य योजना, जिल्हा नाविन्यता क्रमवारी आराखडा, महाराष्ट्र व्हर्चुअल इनक्युबेशन सेंटर, आणि ‘हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राची’ यांसारख्या अनेक कार्यक्रमांची यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. या कार्यक्रमां मुळे राज्यातील अनेक नवउद्योजकांना उद्योजकतेशी निगडीत विविध प्रकारचे सहाय्य व मार्गदर्शन उपलब्ध होत आहे. अशा विविध उपक्रम व यशस्वीतेमुळे नीती आयोगातर्फे जाहीर करण्यात आलेल्या इनोवेशन इंडेक्स 2020 मध्ये राज्याने द्वितीय क्रमांक पटकावला आहे, असे मंत्री श्री. मलिक यांनी सांगितले.