The examination of Arogya University on January 22 will be held as per the scheduled schedule
आरोग्य विद्यापीठाची दि.22 जानेवारी रोजीची परीक्षा नियोजित वेळापत्रकाप्रमाणे होणार
नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची विविध विद्याखांची फेज-3 मधील लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा विद्यापीठाने जाहिर केलेल्या नियोजित वेळापत्रकाप्रमाणे घेण्यात येणार आहे.
दि. 22 जानेवारी 2024 रोजी योध्या येथील श्री रामलल्लांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा असल्याने शासनाने सुट्टी जाहिर केली आहे, मात्र विद्यापीठाने हिवाळी सत्र करीता फेज-3 साठी जाहिर केलेल्या नियोजित वेळापत्रकाप्रमाणे राज्यातील सर्व परीक्षा केंद्रावर लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येणार असल्याचे विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी सांगितले आहे.
या परीक्षेकरीता प्रविष्ट सर्व विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या सूचनेची नोंद घ्यावी. विद्यापीठाचे सर्व संलग्नित महाविद्यायातील अधिष्ठाता, प्राचार्य यांनी नियोजित यावेळापत्रकाप्रमाणे होणाऱ्या परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना माहिती द्यावी असे डॉ संदीप कडू यांनी सांगितले आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “आरोग्य विद्यापीठाची परीक्षा नियोजित वेळापत्रकाप्रमाणे 22 जानेवारीला”