The helpline number is operational in connection with Maharojgar Mela
महारोजगार मेळाव्याच्या अनुषंगाने हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वित
मेळाव्यासाठी ९२७०११९६३४ हा हेल्पलाईन क्रमांक
पुणे, सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यातील विविध शैक्षणिक पात्रता धारण करीत असलेल्या नोकरी इच्छुक तरूणांना रोजगार व ॲप्रेंटिसच्या संधी
पुणे : पुणे विभागातील सुशिक्षित बेरोजगार तरूणांना रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी बारामती येथील विद्या प्रतिष्ठानचे कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय येथे २ व ३ मार्च २०२४ रोजी आयोजित विभागस्तरीय नमो महारोजगार मेळाव्यासाठी ९२७०११९६३४ हा हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे.
पुणे, सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यातील विविध शैक्षणिक पात्रता धारण करीत असलेल्या नोकरी इच्छुक तरूणांना रोजगार व ॲप्रेंटिसच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. नोकरी इच्छुक तरूणांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेण्याकरिता विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in/#/registerया लिंकवर नावनोंदणी करून घ्यावी. अधिक माहितीसाठी वर दिलेल्या हेल्पलाईन क्रमांकावर सकाळी ९ ते सायं. ६ या वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या उपआयुक्त अनुपमा पवार यांनी केले आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
हे ही अवश्य वाचा
महाविद्यालयांच्या प्राचार्यांशी मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांचा संवाद