धनकवडी येथे महिलांसाठी महारोजगार मेळाव्याचे आयोजन

Job opportunities in industries registered on Mahaswayam webportal महास्वयंम वेबपोर्टलवर नोंदणीकृत उद्योगांमध्ये नोकरीची संधी हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Maharojgar Mela for women at Dhankawadi

धनकवडी येथे महिलांसाठी महारोजगार मेळाव्याचे आयोजनSkill Development, Employment and Entrepreneurship Guidance Centre कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

पुणे : कौशल्य, रोजगार व उद्योजकता आयुक्तालय पुणे आणि भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ आर्किटेक्चर यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार १७ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ आर्किटेक्चर धनकवडी येथे महिलांसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या रोजगार मेळाव्यात जिल्ह्यातील औद्योगिक परिसरातील विविध नामांकित उद्योजकांनी सहभाग दर्शविलेला असून, त्यांच्याकडून एक हजारापेक्षा अधिक रिक्तपदे कळविण्यात आलेली आहेत. हा मेळावा विविध पात्रताधारक महिला उमेदवारांसाठी असून जिल्ह्यातील नोकरीइच्छुक महिला उमेदवारांना या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून नोकरीच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

नोकरी इच्छुक महिला उमेदवारांनी रिक्तपदांबाबत अधिक माहितीसाठी या विभागाच्या https://www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन आपले पसंतीक्रम ऑनलाईन पद्धतीने नोंदवावे. रोजगार मेळाव्याच्या दिवशी मुलाखतीस येताना सोबत आपली सर्व शैक्षणिक कागदपत्रे, पासपोर्ट आकाराची छायाचित्रे, आवश्यकतेनुसार अर्ज व आधारकार्डाच्या छायांकित प्रती सोबत आणाव्यात.

जिल्ह्यातील अधिकाधिक महिला उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी ०२०-२६१३३६०६ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे सहायक आयुक्त सचिन जाधव यांनी केले आहे.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
मकर संक्रांतीनिमित्त कारागृह बंदी निर्मित वस्तूंच्या प्रदर्शनाचे आयोजन
Spread the love

One Comment on “धनकवडी येथे महिलांसाठी महारोजगार मेळाव्याचे आयोजन”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *