मुंबईत फेब्रुवारी महिन्यात महासंस्कृती महोत्सवात

overnment of Maharashtra logo हडपसर मराठी बातम्या Hadapsar News Hadapsar Latest News

Mahasanskriti Mahotsav in February in Mumbai

मुंबईत फेब्रुवारी महिन्यात महासंस्कृती महोत्सवात

महासंस्कृती महोत्सवात सहभाग नोंदविण्याचे आवाहनovernment of Maharashtra logo हडपसर मराठी बातम्या Hadapsar News Hadapsar Latest News

मुंबई : मुंबई शहर जिल्ह्यामध्ये फेब्रुवारी महिन्यात महासंस्कृती महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. महासंस्कृती महोत्सवामध्ये सांस्कृतिक रंगमंचावरील कार्यक्रम, प्रदर्शनीय दालनेही असणार आहेत. त्यासाठी इच्छुक संस्था, कलाकार संच/समूह/महाविद्यालये/शैक्षणिक संस्था यांच्याकडून ५ फेब्रुवारी, २०२४ रोजी सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत.

संबंधितांनी अर्ज rdcmumbaicity@gmail.com या ई-मेल आयडीवर अथवा तहसीलदार तथा रचना व कार्यपद्धती अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर, रुम नं. १०७, पहिला मजला, जुने जकात घर, फोर्ट मुंबई- ०१ यांच्याकडे कार्यालयीन वेळेत पाठविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

या महोत्सवात आपल्या राज्यातील संस्कृती दर्शविणारे कार्यक्रम, शिवचरित्रावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम, लोककला, कवितांचे कार्यक्रम व व्याख्याने, देशभक्तीपर गीते, जिल्ह्यातील स्थानिक सण, उत्सव आदीबाबत विविध कार्यक्रम आणि राज्य संरक्षित स्मारके आणि गडकिल्ले यांची माहिती सादर केली जाणार आहे

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
‘…अखंड भारताचे स्वप्न पाहणाऱ्या सुपुत्राचा गौरव’
Spread the love

One Comment on “मुंबईत फेब्रुवारी महिन्यात महासंस्कृती महोत्सवात”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *